शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंनी ‘सुंदरीं’ना ठेवावे दूर

By admin | Updated: September 11, 2014 01:54 IST

आयसीसी विश्वचषक २०१५ चे आयोजन यशस्वी करण्यासाठी आणि स्पर्धेला भ्रष्टाचार आणि सट्टेबाजीपासून मुक्त ठेवण्यासाठी क्रिकेटपटूंनी अनोळखी सुंदर तरुणींपासून दूर राहावे

नवी दिल्ली : आयसीसी विश्वचषक २०१५ चे आयोजन यशस्वी करण्यासाठी आणि स्पर्धेला भ्रष्टाचार आणि सट्टेबाजीपासून मुक्त ठेवण्यासाठी क्रिकेटपटूंनी अनोळखी सुंदर तरुणींपासून दूर राहावे, असा सल्ला न्यूझीलंडच्या पोलीस प्रशासनाने दिला आहे.आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या संयुक्त आयोजनाखाली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान सट्टेबाज सुंदर तरुणींच्या माध्यमातून खेळाडूंना फसवू शकतात. यामुळे न्यूझीलंड पोलिसांनी खेळाडूंना हा इशारा दिला आहे.न्यूझीलंडमध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार, सॅँड्रा मॅँडरसन या पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, सट्टेबाज महिलांच्या मदतीने खेळाडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतात. यामुळे पोलिसांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. आम्ही या सट्टेबाजांना ओळखतो, ते महिलांचा वापर करून खेळाडूंवर प्रभाव टाकू शकतात. ते म्हणाले, या स्पर्धेदरम्यान कोट्यवधी रुपयांचा सट्टा लागण्याची शक्यता आहे. अनेकवेळा खेळाडूंनी त्यांचे म्हणणे मान्य करण्यास नकार दिल्यास त्यांच्यासमवेत काढलेल्या महिलांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल करतात.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि विविध देशांच्या क्रिकेट संघटना मॅच फिक्सिंग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, तरीही मॅच फिक्सिंगचे प्रयत्न होत आहेत. न्यूझीलंडच्या लू विन्सेट या खेळाडूला मॅच फिक्सिंगप्रकरणी शिक्षा भोगावी लागली आहे. त्याने आपली चूक कबूल केली आहे. तरीही पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेदरम्यान मॅच फिक्सिंगचा धोका आहे. (वृत्तसंस्था)