पेनल्टी कॉर्नरवर मेहनत घ्यावी लागेल

By Admin | Updated: June 16, 2015 02:04 IST2015-06-16T02:04:58+5:302015-06-16T02:04:58+5:30

भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नरवर विशेष मेहनत घ्यावी लागेल, असे मत एफआयएच विश्व हॉकी लीगच्या सेमीफायनलपूर्वी

Penalty corners have to work hard | पेनल्टी कॉर्नरवर मेहनत घ्यावी लागेल

पेनल्टी कॉर्नरवर मेहनत घ्यावी लागेल

एंटवर्प : भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नरवर विशेष मेहनत घ्यावी लागेल, असे मत एफआयएच विश्व हॉकी लीगच्या सेमीफायनलपूर्वी झालेल्या सराव सामन्यांनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक पॉल वान ऐस यांनी व्यक्त केले.
भारताला रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात बेल्जियमविरुद्ध २-१ ने पराभव स्वीकारावा लागला. सरदारसिंंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या सराव सामन्यात फ्रान्सचा १-० ने पराभव केला होता. विश्व हॉकी लीगच्या सेमीफायनलमध्ये भारताला सलामी लढतीत २० जून रोजी फ्रान्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या गटात पाकिस्तान, आॅस्ट्रेलिया व पोलंड या संघांचाही समावेश आहे.
वान ऐस म्हणाले, ‘‘सराव सामन्यांत आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले. आम्ही फ्रान्सचा पराभव केला, तर बेल्जियमविरुद्ध थोड्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. दोन सराव सामन्यांतील कामगिरीचा विचार करताना सुरुवातीपासून प्रतिस्पर्धी संघावर दडपण निर्माण करणे आवश्यक असल्याचे दिसून येते. डीमध्ये संधीचा शोध घेण्यापेक्षा पेनल्टी कॉर्नर मिळविण्यावर मेहनत घ्यावी लागेल. आमच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघाची बचाव फळी भेदण्यात यश मिळवले; पण गोल नोंदवणेही आवश्यक आहे. सुरुवातीलाच गोल नोंदवला तर प्रतिस्पर्धी संघावर दडपण येते.’’
बचावाबाबत वान ऐस म्हणाले, ‘‘दोन्ही सामन्यांमध्ये बचाव चांगला होता. आम्हाला बेल्जियमविरुद्ध २ गोल स्वीकारावे लागले असले, तरी बचाव फळीची कामगिरी उल्लेखनीय ठरली.’’
दरम्यान, महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक मथियास अहरेंस म्हणाले, ‘‘सलामी लढतीत यजमान बेल्जियमला गृहमैदानावर खेळण्याचा लाभ मिळेल. उभय संघ तुल्यबळ असून, सुरुवातीला दडपण निर्माण करणे आवश्यक आहे. आमची आघाडीची फळी चांगली असून मला शानदार सुरुवातीचा विश्वास आहे. संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या सर्कलमध्ये चेंडूवर नियंत्रण राखण्याचे महत्त्व ओळखले असून, शॉर्ट पासेसवर लक्ष केंद्रित केले आहे.’’ (वृत्तसंस्था)

Web Title: Penalty corners have to work hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.