पवारांनी माघार घ्यावी

By Admin | Updated: June 13, 2015 01:41 IST2015-06-13T01:41:05+5:302015-06-13T01:41:05+5:30

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या प्रतिष्ठेच्या मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. एमसीए अध्यक्षपदासाठी थेट विद्यमान

Pawar should withdraw | पवारांनी माघार घ्यावी

पवारांनी माघार घ्यावी

मुंबई : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या प्रतिष्ठेच्या मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. एमसीए अध्यक्षपदासाठी थेट विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध निवडणुकीत उभे राहिलेले ‘क्रिकेट फर्स्ट’ गटाचे प्रमुख डॉ. विजय पाटील यांनी पवार यांना निवडणुकीतून माघार घेण्याचा आग्रह केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबई क्रिकेटवर कायमच वर्चस्व राहिले आहे. एमसीएचे विद्यमान उपाध्यक्ष असलेले पाटील यांनी यंदा थेट अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज करताना थेट पवार यांच्यासमोर आव्हान उभे केल्याने यंदाची निवडणूक चांगलीच अटीतटीची झाली आहे.
याविषयी पाटील म्हणाले की, मी शरद पवार यांचा अत्यंत सम्मान करतो. त्यांनी राजकीय व सार्वजनिक पातळीवर खूप मोठ्या पदावर राहून कार्य केले असून, त्यांचा अनुभव दांडगा आहे. मात्र या वेळी त्यांनी क्रिकेट फर्स्ट गटाला शुभेच्छा देऊन आशीर्वाद द्यावा. तसेच, मी जरी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला असला तरी, मी पवार यांच्या विरोधात नसून एमसीएच्या प्रशासनाविरुद्ध लढत आहे. या प्रशासनामध्ये अनेक बदल करण्यासाठी मी निवडणूक लढवत असल्याचेदेखील पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, क्रिकेट फर्स्ट गटातून पाटील यांच्याव्यतिरिक्त लालचंद राजपूत, प्रवीण आमरे आणि अ‍ॅबी कुरविल्ला यांसारख्या माजी क्रिकेटपटूंसह माजी रणजी फिरकीपटू संजय पाटील हे एमसीएच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
पवार यांच्याच पवार - म्हाडदळकर गटाच्या रवी सावंत व आशिष शेलार यांनीदेखील अध्यक्षपदासाठी अर्ज केल्याने वेगळीच रंगत निर्माण झाली होती. मात्र सत्ताधारी म्हाडदळकर गटाने हे दोन्ही अर्ज केवळ डमी असल्याचे सांगितल्याने अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे १३ जूनला सावंत व शेलार आपआपला अर्ज मागे घेतील हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता १७ जूनला होणाऱ्या अध्यक्षपदासाठी पवार वि. पाटील अशी थेट लढत होईल हे स्पष्ट आहे. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Pawar should withdraw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.