ऑलिम्पिकदरम्यान भारताच्या आघाडीच्या महिला गोल्फरच्या कारला पॅरिसमध्ये अपघात, कुटुंबीयही होते सोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 19:04 IST2024-08-01T19:02:42+5:302024-08-01T19:04:01+5:30
paris olympics 2024 : फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय क्रीडापटू समाधानकारक कामगिरी करत आहेत. दरम्यान, पॅरिसमधून भारतासाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारताची महिला गोल्फपटू दीक्षा डागर हिच्या कारला अपघात झाला आहे.

ऑलिम्पिकदरम्यान भारताच्या आघाडीच्या महिला गोल्फरच्या कारला पॅरिसमध्ये अपघात, कुटुंबीयही होते सोबत
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय क्रीडापटू समाधानकारक कामगिरी करत आहेत. दरम्यान, पॅरिसमधून भारतासाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारताची महिला गोल्फपटू दीक्षा डागर हिच्या कारला अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात दीक्षा हिला दुखापत झालेली नाही, मात्र तिची आई जखमी झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीक्षा डागर हिच्या कारला ३० जुलै रोजी संध्याकाळी पॅरिसमध्ये अपघात झाला. त्यात तिची आई जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे दीक्षा पूर्णपणे तंदुरुस्त असून, ती ऑलिम्पिकमधील तिच्या लढतीत खेळण्यासाठी उतरणार आहे. हा अपघात झाला तेव्हा कारमध्ये दीक्षा हिच्यासोबत तिच्या कुटुंबातील चार सदस्य होते.
पॅरिस ऑलिम्पिकमधील गोल्फचे महिला गटाचे सामने ७ ते १० ऑगस्टदरम्यान होणार आहेत. त्यात दीक्षाचा पहिला सामना हा ७ ऑगस्ट रोजी होणार आहे. गोल्फच्या महिला गटामध्ये भारताकडून दीक्षा डागर हिच्यासह अदिती अशोक ही दुसरी खेळाडू सहभागी होणार आहे. तर पुरुष गटामध्ये शुभंकर शर्मा आणि गगनजीत भुल्लर हे सहभागी झाले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे एकूण चार गोल्फपटू सहभागी झाले आहेत.