शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

"मनू भाकरने माफी मागावी", तत्कालीन मंत्र्याच्या विधानाचा दाखला देत प्रियंका चतुर्वेदी भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 20:56 IST

 Paris Olympic 2024 News : भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमधील पहिले पदक जिंकण्यात यश आले.

Paris Olympic 2024 Updates In Marathi : भारताची नेमबाज मनू भाकरने आपल्या देशाला यंदाच्या ऑलिम्पिकमधील पहिले पदक जिंकून दिले. तिने १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत कांस्य पदक जिंकले. मनूने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते विविध क्षेत्रातील दिग्गजांनी भारताच्या या लेकीच्या खेळीला दाद दिली. पण, दुसरीकडे राजकारणही तापल्याचे दिसते. मनू भाकरचा हरयाणाचे तत्कालीन मंत्री अनिल विज यांच्यासोबत झालेला वाद आणि त्याबद्दलच्या जुन्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचाच दाखला देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तत्कालीन मंत्र्यावर टीका केली.

खरे तर मनू भाकरने ऑक्टोबर २०१८ मध्ये झालेल्या युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. मनू भाकरच्या विजयानंतर आनंद व्यक्त करत अनिल विज यांनी बक्षिसाची रक्कम जाहीर केली होती. युवा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल मनू भाकरचे अभिनंदन. सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल मनूला राज्य सरकार २ कोटी रुपयांचे रोख बक्षीस देत आहे. पूर्वीची सरकारे फक्त १० लाख रुपये देत असत, असे तत्कालीन मंत्री अनिल वीज यांनी म्हटले होते.

२०१९ मध्ये अनिल विज यांनी जाहीर केलेल्या बक्षिसावर व्यक्त होताना मनूने सांगितले होते की, सर, हे खरे आहे की केवळ घोषणा आहे. याची खात्री करायला हवी. त्यावेळी मनूने तिच्या पोस्टसोबत विज यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. मनू भाकरची ही पोस्ट पाहताच तत्कालीन मंत्री अनिल विज चांगलेच संतापले. संतप्त प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, खेळाडूंना शिस्त असली पाहिजे. हा वाद निर्माण केल्यामुळे मनू भाकरने माफी मागायला हवी. तिला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. तिने फक्त तिच्या खेळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. दरम्यान, आता मनूने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच अनिल विज यांनी तिचे कौतुक केले. मात्र, जुनी पोस्ट व्हायरल करत खासदार चतुर्वेदी यांनी त्यांना डिवचले.

२०१९ मधील हरयाणा सरकारचे तत्कालीन मंत्री यांना आता लाज नसल्यासारखे मनू भाकरच्या कांस्य पदक जिंकण्याचे श्रेय घ्यायचे असावे असे दिसते, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Shiv SenaशिवसेनाMember of parliamentखासदार