शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

Paralympics : भारताचा ध्वजधारक मरियप्पन थंगवेलूला व्हावे लागले क्वारंटाईन, जपानी व्हॉलेंटियरच्या हाती तिरंगा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 10:21 AM

पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरू होणार आहे. भारताचा ५४ सदस्यांचा पथक टोक्योत दाखल झाला असून उद्घाटन सोहळ्यात रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता मरियप्पन थंगवेलू ध्वजधारक म्हणून दिसणार होता.

पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरू होणार आहे. भारताचा ५४ सदस्यांचा पथक टोक्योत दाखल झाला असून उद्घाटन सोहळ्यात रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता मरियप्पन थंगवेलू ध्वजधारक म्हणून दिसणार होता. पण, उंच उडीपटू थंगवेलू याला क्वारंटाईन व्हावे लागले आहे. थंगवेलू ज्या विमानातून टोक्योत दाखल झाला, त्यातील प्रवासी कोरोनाग्रस्त आढळला. त्यामुळे टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात जपानी व्हॉलेंटियरच्या हाती भारताचा तिरंगा दिसणार आहे. ( A Japanese volunteer is likely to carry the Indian national flag at the opening ceremony of the Tokyo 2020 Paralympics)

मराठी माणसानं जिंकलेलं पॅरालिम्पिक स्पर्धेत पहिलं पदक; जाणून घेऊया १२ पदकांचा गौरवशाली इतिहास!

थंगवेलू हा जपान नॅशनल स्टेडियमवर ध्वजधारक असेल अशी घोषणा भारतीय पॅरालिम्पिक समितीनं दिली होती. २०१९च्या जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावून टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत स्थान पटकावले होते.  पण, आता उद्घाटन सोहळ्यात थंगवेलू ध्वजधारकाच्या भूमिकेत दिसणार नाही. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.३० वाजल्यापासून हा उद्घाटन सोहळा सुरू होणार आहे. थंगवेलू या स्पर्धेत उंच उडी F42 क्रीडा प्रकारात सहभाग घेणार आहे. याच प्रकारात त्यानं २०१६च्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत १.८९ मीटर उंच उडी मारून सुवर्णपदक जिंकले होते. त्याला खेल रत्न पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.  ( 6 members of the Indian contingent at Paralympic including flag bearer Mariyappan Thangavelu identified as close contact of a COVID positive person and won't be able to participate in the opening ceremony.)

उद्घाटन सोहळ्यात भारताचे पाच खेळाडू व सहा अधिकारी सहभागी होणार होते. थंगवेलूसह थाळीफेकपटू विनोद कुमार, भालाफेकपटू टेक चंद आणि पॉवलिफ्टर जयदीप व सकिना खातून यांचा समावेश होता.                                                                                               

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ