पॅराग्वेने अर्जेंटिनाला बरोबरीत रोखले
By Admin | Updated: June 15, 2015 01:01 IST2015-06-15T01:01:00+5:302015-06-15T01:01:00+5:30
पॅराग्वे संघाच्या खेळाडूंनी अफलातून खेळ करीत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत विजयाच्या आत्मविश्वासाने मैदानात उतरलेल्या अर्जेंटिना संघाला २-२- गोल बरोबरीत रोखले.

पॅराग्वेने अर्जेंटिनाला बरोबरीत रोखले
ला सेरेना (चिली) : पॅराग्वे संघाच्या खेळाडूंनी अफलातून खेळ करीत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत विजयाच्या आत्मविश्वासाने मैदानात उतरलेल्या अर्जेंटिना संघाला २-२- गोल बरोबरीत रोखले.
सुरुवातीपासून चुरशीच्या झालेल्या या सामन्यात दोन गोलने पिछाडीवर असलेल्या पॅराग्वे संघाने २२ वर्षांत आपले पहिले विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने या स्पर्धेत उतरलेल्या अर्जेंटिना संघाला धक्का दिला. ब गटाच्या या लढतीत
इंग्लिश प्रिमियर लीगचा स्टार
खेळाडू सर्जियो एगुएरो याने २९व्या मिनिटाला संघाचा पहिला गोल केला. नंतर अर्जेंटिनाला मिळालेल्या पेनेल्टीद्वारे कर्णधार लियोनेल मेस्सीने दुसरा गोल केला. मेस्सीचा आपल्या राष्ट्रीय संघासाठी ९८ सामन्यांमधील ४७ वा गोल होता. अर्जेंटिनाने
पहिल्या हाफमध्ये २-० अशी आघाडी घेतली होती.
विश्रांतीनंतर पॅराग्वेच्या नेल्सन वाल्डेजने ७१ व्या मिनिटाला लांबून चेंडूला जोरदार किक मारून आपल्या संघाचा पहिला गोल केला. दुसरा गोल अर्जेंटिनामध्ये जन्मलेला फॉरवर्ड खेळाडू लुकास बारियोसने ९० व्या मिनिटाला दुसरा गोल करून बरोबर साधली.
पॅराग्वेच्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी नियोजनपूर्वक खेळ करीत अर्जेंटिनाला बरोबरी रोखण्यात यश मिळविले.
(वृत्तसंस्था)