शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

पान 4 : गोव्यात आठ महिन्यांत 11 महिलांचे खून

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST

गोव्यात आठ महिन्यांत 11 महिलांचे खून

गोव्यात आठ महिन्यांत 11 महिलांचे खून
तीन खुनांत पतीचाच हात : दोन अल्पवयीन मुलींच्याही हत्या
सुशांत कुंकळयेकर : मडगाव
गोव्यात महिलांवरील अत्याचार वाढलेले असतानाच महिलांचे खून करण्याचेही प्रकार वाढले आहेत. मागच्या आठ महिन्यांत गोव्यात एकूण 23 खुनांची नोंद झाली आहे. त्यापैकी 11 खून हे महिलांचे असून तीन महिलांचे खून त्यांच्या पतीनेच केल्याचे उघडकीस आले आहे.
शुक्रवारी कुंकळ्ळी येथील जीया नाईक या 35 वर्षीय महिलेचा तिचाच पती जयेश नाईक याने खून केल्याने हा सारा परिसर हादरून गेला. जीयावर संशय असल्यानेच जयेशने हा खून केला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष काढला आहे. हा खून अत्यंत निर्घृण आहे. जीयाच्या अंगावर कित्येक सुर्‍याचे वार केल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वी अशाच प्रकारच्या आणखी दोन घटना झाल्याची माहिती पोलीस दफ्तरातून प्राप्त झाली आहे. 1 फेब्रुवारी रोजी अनिशा बार्ला या मूळ झारखंड येथील महिलेचा धारगळ येथे तिचाच पती सुनील याने खून केला होता. अनिशाच्या चारित्र्यावर असलेल्या संशयानेच खून झाला होता. 4 जून रोजी केरी-सत्तरी येथे भाग्यर्शी झोरे या 23 वर्षीय महिलेचा खून झाला होता. याही प्रकरणात पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतले होते.
जानेवारीपासून गोव्यात महिलांचे खून करण्याच्या घटना होत असून 31 जानेवारी रोजी काणकोण येथील विजया पागी या मासे विक्रेतीवर राम भरोसे या बिहारी कामगाराने प्रथम बलात्कार करून नंतर खून केला होता. 1 जून रोजी अशीच एक घटना गोवा वेल्हा येथे घडली होती. एका 69 वर्षीय वृद्धेवर बलात्कार करून नंतर तिचा खून केला होता. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या दरम्यान गोव्यात दोन लहान मुलींचेही खून होण्याच्या घटना घडल्या आहेत. यापैकी पहिली घटना कुंकळ्ळी येथे ओद्योगिक वसाहतीजवळ घडली होती. एका सहा वर्षीय मुलीचा खून केल्याच्या आरोपावरून कुंकळ्ळी पोलिसांनी शशिकांत गावकर या इसमाला अटक केली होती. मात्र, त्याच्याविरुध्द काहीच ठोस पुरावे हाती न लागल्यामुळे अजून त्याच्यावर आरोपपत्रही दाखल करण्यात आलेले नाही. 90 दिवसांत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे न्यायालयाने त्याला जामीनमुक्त केले आहे. 25 ऑगस्ट रोजी नेसाय येथे रुबीना पोसे या बारा वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला होता. तिच्या मृतदेहावर जखमा सापडल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचे उघडकीस आले होते. मात्र, रुबीनाचा खुनी कोण हे अजूनपर्यंत पोलिसांना समजलेले नाही.
महिलांचे खून होण्याच्या 11 घटनांपैकी हणजुणे व कुंकळ्ळी या पोलीस स्थानकात प्रत्येकी दोन गुन्हय़ांची नोंद झाली आहे, तर काणकोण, कोलवा, पेडणे, आगशी, वाळपई व मायणा-कुडतरी पोलीस स्थानकात एका घटनेची नोंद झाली आहे. या 11 खुनांपैकी तीन खुनांचा तपास अजून लागलेला नाही. तर एका प्रकरणात पोलिसांचा तपास भरकटला आहे.