क्रीडा विश्वावर शोककळा! एकाच दिवशी भारताच्या दोन ऑलम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचं कोरोनानं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 09:00 PM2021-05-08T21:00:31+5:302021-05-08T21:01:21+5:30

भारतीय हॉकीसाठी ८ मे म्हणजेच आजचा दिवस सर्वात वाईट दिवस ठरला आहे. कारण देशाच्या दोन दिग्गज हॉकीपटू आणि ऑलम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचं कोरोनामुळे निधन झालं आहे.

olympic gold medalist hockey player mk kaushik and Ravinder Pal Singh died due to corona | क्रीडा विश्वावर शोककळा! एकाच दिवशी भारताच्या दोन ऑलम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचं कोरोनानं निधन

क्रीडा विश्वावर शोककळा! एकाच दिवशी भारताच्या दोन ऑलम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचं कोरोनानं निधन

googlenewsNext

भारतीय हॉकीसाठी ८ मे म्हणजेच आजचा दिवस सर्वात वाईट दिवस ठरला आहे. कारण देशाच्या दोन दिग्गज हॉकीपटू आणि ऑलम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचं कोरोनामुळे निधन झालं आहे. रविंदर पाल सिंह आणि एमके कौशिक यांना कोरोनाची लागण झाली होती. दोघंही गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि रुग्णालयात उपचार सुरू होते. भारताच्या ऑलम्पिक सुवर्णपदक विजेत्या संघाचे सदस्य राहिलेल्या एमके कौशिक यांना दिल्लीतील एका नर्शिंग होममध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची परिस्थिती गंभीर होती. कौशिक ६६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा असे कुटुंब आहे. कौशिक यांना १७ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. आज त्यांच्या तब्येतीत आणखी बिघाड झाल्यानं त्यांना वेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. (olympic gold medalist hockey player mk kaushik and Ravinder Pal Singh died due to corona)

कौशिक यांच्यासोबत त्यांच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावरही याच नर्सिंग होममध्ये उपचार सुरू आहेत. कौशिक यांचं भारतीय हॉकी संघात महत्वाचं स्थान होतं. १९८० सालच्या मॉक्सो ऑलम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग होते. भारतासाठी हे ऑलम्पिकमधील शेवटचं सुवर्णपदक ठरलं होतं. यानंतर भारताला हॉकीमध्ये अद्याप सुवर्णपदक पटकावता आलेलं नाही. 

इतकंच नव्हे, तर कौशिक भारताच्या सिनिअर पुरूष आणि महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक देखील राहिले आहेत. 2002 साली त्याच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारतीय हॉकी संघानं कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती. 

कौशिक यांच्यासोबत आज सकाळी भारताचे माजी हॉकीपटू रविंदर पाल सिंग यांचंही कोरोनामुळे निधन झालं. गेल्या दोन आठवड्यांपासून रविंदर पाल कोरोनाविरोधात लढत होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचं लखनऊ येथे निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. १९८० सालच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या  भारतीय संघात रविंदर यांचाही समावेश होता. 
 

Web Title: olympic gold medalist hockey player mk kaushik and Ravinder Pal Singh died due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.