शहरं
Join us  
Trending Stories
1
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
2
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
3
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
4
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
5
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
6
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
7
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
8
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
9
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
10
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
11
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
12
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
13
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
14
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
15
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
16
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
17
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
18
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
19
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
20
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नंबर वन कसोटी संघाला १० लाख डॉलर

By admin | Updated: October 14, 2015 00:04 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अव्वल कसोटी संघाला देण्यात येणारी बक्षीस रक्कम दहा लाख डॉलर इतकी केली आहे. आधी ही रक्कम पाच लाख डॉलर होती.

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अव्वल कसोटी संघाला देण्यात येणारी बक्षीस रक्कम दहा लाख डॉलर इतकी केली आहे. आधी ही रक्कम पाच लाख डॉलर होती. १ एप्रिल २०१६ पासून बक्षिसाची रक्कम दुप्पट होईल. याशिवाय महिला क्रिकेटमधील गुंतवणूक पाचपट वाढविण्याचा निर्णय बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला.गेल्या आठ वर्षांच्या तुलनेत खेळाडूंना बक्षिसापोटी देण्यात येणाऱ्या रकमेत ४१ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यानुसार १ एप्रिल २०१६ रोजी अव्वल स्थानावर असलेल्या कसोटी संंघास दहा लाख डॉलर मिळतील. आयसीसीच्या असोसिएट्स आणि अ‍ॅफिलिएट सदस्य देशांना मिळणाऱ्या रकमेत २० कोटी ८० लाख डॉलर अशी वाढ करण्यात आली आहे. आयसीसीद्वारे १९ वर्षे गटाचा पुढील विश्वचषक बांगलादेशात आयोजित करण्यात येणार आहे. आयसीसीने पंचांचे कौतुक करताना २०१५ च्या विश्वचषकानंतर सर्वच आंतरराष्ट्रीय सामन्यात योग्य निर्णय देण्यासाठी पाठ थोपटली आहे. शिवाय संशयास्पद शैलीच्या मुद्यावर केलेल्या कामाचेदेखील समर्थन केले.२०१६ ते २०२३ या कालावधीत आयोजित होणाऱ्या आयसीसीच्या सहा महिला स्पर्धांसाठी लागणाऱ्या निधीत पाचपटीने वाढ करण्यात आली. इंग्लंडमध्ये आयोजित २०१७ च्या महिला विश्वचषक विजेत्या संघाला दहा लाख डॉलर बक्षीस असेल. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जाईल. अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. आयसीसी महिला चॅम्पियनशिपची दुसरी स्पर्धा २०१७ च्या स्पर्धेनंतर होईल. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आक्रमक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी पुरुष क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणातील मर्यादेशी जुळलेले दोन नियम वगळता अन्य सर्व नियम महिलांसाठी देखील लागू करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)