शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

आता म्हणाल का रोहितची विकेट ढापली !

By admin | Updated: June 16, 2017 09:40 IST

भारताचा अव्वल सलामीवीर रोहित शर्मा काल पुन्हा बांगलादेशच्या गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरला. रोहित शर्मा खेळपट्टीवर उभा राहिला की, काय घडते..

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16 - भारताचा अव्वल सलामीवीर रोहित शर्मा काल पुन्हा बांगलादेशच्या गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरला. रोहित शर्मा खेळपट्टीवर उभा राहिला की, काय घडते याचा अनुभव पुन्हा एकदा बांगलादेशच्या गोलंदाजांनी घेतला. निदान इतक्या मोठया पराभवातून तरी, बांगलादेशचा संघ आणि त्यांचे चाहते योग्य तो धडा घेऊन शहाणे होतील आणि पुन्हा भारताच्या वाटयाला जाणार नाहीत अशी अपेक्षा करुया. 
 
2015 वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्वफेरीत बांगलादेशची गाठ भारताबरोबर पडली होती. त्या सामन्यात रोहित शर्माला नाबाद ठरवण्याच्या पंचांच्या निर्णयावरुन बांगलादेशमध्ये प्रचंड वाद झाला होता. बांगलादेशी गोलंदाज रुबेल होसैनच्या चेंडूवर रोहितचा मिडविकेटला झेल पकडला पण रुबेलचा चेंडू कमरेच्यावर असल्याचे पंच अलीम दार यांनी रोहितला नाबाद ठरवले. रिप्लेमध्ये चेंडू योग्य उंचीवर असल्याचे दिसत होते. त्यामुळे रोहितचा विकेट ढापला असे बांगलादेशी क्रिकेटप्रेमींचे म्हणणे होते. 
 
रोहित त्यावेळी 90 धावांवर खेळत होता. मिळालेल्या संधीचा फायदा घेत रोहितने बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्या सामन्यात रोहितने 137 धावा फटकावल्या. रोहितच्या या शतकी खेळीमुळे भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी 303 धावांचे आव्हान ठेवले होते. पण बांगलादेशचा डाव 193 धावात आटोपला आणि भारताने 109 धावांनी विजय मिळवला. 
 
आणखी वाचा 
 
रोहितला बाद दिले असते तर, त्यावेळी  भारताचा डाव दबावाखाली आला असता. त्यांना इतकी मोठी मजल मारता आली नसती. आम्ही भारताला पराभूत केले असते अशा वल्गना त्यावेळी बांगलादेशी क्रिकेटप्रेमींनी केल्या होत्या. बांगलादेशी मीडिया, माजी क्रिकेटपटू या सर्वांनीच त्यावेळी भारताबद्दल गरळ ओकली होती. बांगलादेशच्या क्रिकेट संघटनेचे माजी प्रमुख मुस्तफा कमाल त्यावेळी आयसीसीचे अध्यक्ष होते. त्यांनीही पंचांच्या निर्णयावर बोट ठेऊन सर्व काही आधीपासूनच फिक्स असल्याचा गंभीर आरोप केला होता. 
 
या आरोपांमुळे त्यांना वर्ल्डकप विजेत्या संघाला ट्रॉफी देण्यापासून रोखण्यात आले. फायनलपासून दूर ठेवल्याने अखेर त्यांनी राजीनामा दिला होता. गुरुवारच्या सामन्यात बांगलादेशच्या 265 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितची नाबाद 123 धावांची खेळी निर्णायक ठरली. रोहितने बांगलादेशच्या संघाला कुठलाही आरोप करण्याची संधी न देता वर्चस्व राखले. 
 
यापूर्वी काही सामन्यांमध्ये भारताला तुल्यबळ लढत दिल्याने आपला संघ भारताच्या तोडीचा असून, आपण भारताला हरवू शकतो असे बांगलादेशी चाहत्यांचा समज झाला होता. सोशल मीडियावरुन तशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. निदान आता तरी ते शहाणे होतील अशी अपेक्षा करुया.