नोवाक जोकोविचकडून राफेल नदाल पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 05:53 IST2021-06-13T05:51:54+5:302021-06-13T05:53:22+5:30

आज रविवारी जोकोविचला जेतेपदाच्या लढतीत ग्रीसचा २२ वर्षांचा स्टोफानोस सिटसिपास याच्याविरुद्ध खेळावे लागेल.

Novak Djokovic defeating Rafael Nadal at the French Open | नोवाक जोकोविचकडून राफेल नदाल पराभूत

नोवाक जोकोविचकडून राफेल नदाल पराभूत

पॅरिस: सर्बियाचा स्टार नोवाक जोकोविच याने फ्रेंच ओपन टेनिसच्या चार तासाहून अधिक वेळ चाललेल्या उपांत्य सामन्यात ‘लाल मातीचा बादशाह’ रोलँड गॅरोसवर १३ वेळा विजेतेपदाचा मानकरी स्पेनचा राफेल नदाल याचा ३-६,६-३, ७-६, ६-२ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.

आज रविवारी जोकोविचला जेतेपदाच्या लढतीत ग्रीसचा २२ वर्षांचा स्टोफानोस सिटसिपास याच्याविरुद्ध खेळावे लागेल. जागतिक क्रमवारीत पहिल्या आणि तिसऱ्या स्थानी विराजमान असलेल्या जोकोविच आणि राफेल नदाल या दोन मातब्बर टेनिसपटूंमधील द्वंद्व चाहत्यांना शुक्रवारी पाहायला मिळाले. जोकोने नदालला फ्रेंच ओपनच्या १०८ सामन्यात तिसऱ्यांदा पराभव पत्करण्यास भाग पाडले. जोकोविच पाचव्यांदा या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. २०१६ मध्ये जेकोने विजेतेपद पटकावले होते. फ्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्या सेटमध्ये विजय मिळवल्यानंतर पराभूत होण्याची नदालची ही पहिलीच वेळ ठरली.

Web Title: Novak Djokovic defeating Rafael Nadal at the French Open