शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

अफगाणपुढे न्यूझीलंडचे आव्हान

By admin | Updated: March 8, 2015 01:38 IST

आॅस्ट्रेलियाकडून दारुण पराभव पत्करणाऱ्या अफगाणिस्तानला उद्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंडकडून कडवे आव्हान मिळणार आहे.

नेपियर : आॅस्ट्रेलियाकडून दारुण पराभव पत्करणाऱ्या अफगाणिस्तानला उद्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंडकडून कडवे आव्हान मिळणार आहे.न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी याने तर अफगाणिस्ताविरुद्ध विजयी घोडदौड सुरू ठेवण्यासाठीच खेळू, असा निर्धार केला आहे.पत्रकारांशी बोलताना साऊदी म्हणाला, ‘‘या स्पर्धेत कमकुवत संघांनी अनेकदा उत्कृष्ट कामगिरी केल्याची उदाहरणे आहेत. अफगाणिस्तानला विजयाची संधी मिळू नये, याची खबरदारी घेतली जाईल.’’ न्यूझीलंडने आधीच क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला असून, अफगाणिस्ताननंतर १३ मार्च रोजी त्यांना हॅमिल्टन येथे बांगला देशविरुद्ध्न खेळायचे आहे.अफगाण संघ आॅस्ट्रेलियाकडून २७५ धावांनी पराभूत झाला असेल; पण सहा वर्षांचा अनुभव असलेल्या या संघाला अद्याप विजयाची आशा आहे. स्कॉटलंडवर या संघाने पहिला विजय साजरा केला, तसेच लंकेला धूळ चारण्यासाठी त्यांनी कंबर कसली होती. पण माहेलाने शतकी खेळी करीत अफगाणिस्तानच्या आशेवर पाणी फेरले. न्यूझीलंड-अफगाणिस्तान संघ वन डेत कधीही परस्परांविरुद्ध खेळलेले नाहीत. न्यूझीलंडचे कोच असलेले माईक हेसन यांनी २०११-१२ मध्ये केनियात प्रशिक्षणादरम्यान अफगाणच्या वेगवान गोलंदाजांना जवळून न्याहाळण्याची संधी मिळाली होती. शापूर जादरान, दौलत जादरान, हमीद हसन हे तिघेही प्रतिताशी १४० कि.मी. वेगवान मारा करू शकतात; शिवाय चेंडू स्विंग करण्याची कला त्यांना अवगत असल्याचे हेसन म्हणाले. गेल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनचा चेंडू आदळल्याने जखमी झालेला कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम उद्या सामना खेळण्यासाठी फिट असल्याचे कोचने सांगितले. (वृत्तसंस्था) न्युझीलंड : बेंडन मॅक्युलम (कर्णधार), कोरी अ‍ॅण्डरसन, ट्रेंट बाउल्ट, ग्रांट एलिओट, मार्टिन गुप्टील, टॉम लॅथम, मिशेल मॅकक्लेनघन, नॅथन मॅक्युलम, कायल मिल्स, अ‍ॅडम मिल्ने, लुक रोंची (यष्टीरक्षक), टिम साऊथी, रॉस टेलर, डॅनिएल व्हिटोरी, केन विलियमन्सन.अफगाणिस्तान : मोहम्मद नाबी (कर्णधार), अफसार जाजाई (यष्टीरक्षक), आफ्ताब आलम, असघर स्तानिक्झाई, दवलत जद्रान, गुलबादीन नैब, हामिद हसन, जावेद अहमदी, मिरवैस अर्शफ, नाजीबुल्लाह जद्रान, नासीर जमाल, नवरोज मंगल, सॅमिउल्लाह शेनवारी, शपूर जद्रान, उसमान घानी, हशमातुल्लाह शाइदी, इजातुल्लाह दवलतजाई, शाफिकउल्लाह, शराफुद्दीन अशराफ