Neeraj Chopra:  नीरज चोप्राची ‘गोल्डन’ कामगिरी, फिनलँडमधील स्पर्धेत ८६.६९ मीटर दूर फेकला भाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 10:56 PM2022-06-18T22:56:04+5:302022-06-18T23:02:22+5:30

नीरज चोप्राने फिनलँडमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. नीरजने पहिल्याच संधीत ८६.६९ मीटर अंतरावर भाला फेकला.

Neeraj Chopra wins gold medal for india at Kuortane Games first since Tokyo Olympics | Neeraj Chopra:  नीरज चोप्राची ‘गोल्डन’ कामगिरी, फिनलँडमधील स्पर्धेत ८६.६९ मीटर दूर फेकला भाला

Neeraj Chopra:  नीरज चोप्राची ‘गोल्डन’ कामगिरी, फिनलँडमधील स्पर्धेत ८६.६९ मीटर दूर फेकला भाला

googlenewsNext

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रानं पुन्हा एकदा गोल्डन कामगिरी केली आहे. त्नीरज चोप्राने शनिवारी फिनलंडमधील कुओर्तने गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावलं. नीरज चोप्राने येथे विक्रमी ८६.६९ मीटर अंतरावर भाला फेकला आणि त्याची बरोबरी कोणी करू शकले नाही. काही दिवसांपूर्वी नीरज चोप्रानेही राष्ट्रीय विक्रमही केला होता.

नीरज चोप्रानं आपल्या पहिल्याच संधीत ८६.६९ मीटर अंतरावर भाला फेकला. याच्या आसपासही कोणी पोहोचू शकलं नाही. त्यानंतर त्यानं आपल्या नावे छोटा स्कोअर येऊ नये यासाठी पुढील दोन्ही संधीत फाऊल केलं. यादरम्यान, नीरज चोप्राला दुखापतही झाली. ज्यावेळी तो भाला फेकण्यासाठी गेला, तेव्हा त्याचा पाय घसरला. परंतु यातूनही तो उठून पुन्हा सज्ज झाला. दरम्यान, यानंतर क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनीदेखील त्याचा एक व्हिडीओ ट्वीट करत कौतुक केलं आहे.


ऐतिहासिक कामगिरी
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने १० महिन्यानंतर झोकात पुनरागमन केले. फिनलँड येथे सुरू असलेल्या Paavo Nurmi Games स्पर्धेतून तो प्रथमच मैदानावर उतरला अन् कमाल करून गेला. नीरज चोप्रानं टोक्योत भालाफेकीत ८७.५८ मीटर कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले. ट्रॅक अँड फिल्डमध्ये भारताला पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम नीरजनं केला. २००८ नंतर ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक नीरजमुळे मिळाले. २००८ मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रानं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे टोक्यो ऑलिम्पिकनंतर त्याच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Web Title: Neeraj Chopra wins gold medal for india at Kuortane Games first since Tokyo Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.