राष्ट्रीय रोइंगपटू निखिल सोनावणेवर नाशिकमध्ये प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 13:25 IST2019-05-15T11:44:05+5:302019-05-15T13:25:30+5:30
मंगळवारी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय रोइंगपटू निखिल सोनावणेला अडवून लूटमार करणाऱ्यांनी हल्ला चढवला

राष्ट्रीय रोइंगपटू निखिल सोनावणेवर नाशिकमध्ये प्राणघातक हल्ला
नाशिक : शहरात घरफोडी, सोनसाखळी चोरी, लुटमार सारखे गुन्हे वाढले असून मंगळवारी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय रोइंगपटू निखिल सोनावणेला अडवून लूटमार करणाऱ्यांनी हल्ला चढवला. त्याला बेदम मारहाण केली. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून आगामी स्पर्धेला त्याला मुकावे लागणार आहे. त्यामुळे त्याच्या आत्तापर्यंतच्या सरावावर पाणी फिरले आहे.
काल रात्री चोपडा लॉन्स जवळ रोईनगपटूवर हल्ला लुटमारीसाठी घरी जाणाऱ्या खेळाडूंवर प्राणघातक हल्ला. नाशिकमधील सरकार वाडा पोलीस ठाणे हद्दीत जुना गंगापूर नाका येथून खेळाडू निखिल हा दुचाकीवरून घराकडे जात होता. यावेळी दोन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी त्याची वाट अडवून रोख रक्कम, मोबाईल आदी वस्तू लुटण्यासाठी प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात निखील ला गंभीरपणे दुखापत झाली आहे याच्यावर देवगावकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या हल्ल्याप्रकर्णी पोलिसांनी नोंद केली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
निखील जवळ रोकड वगैरे काहीही न मिळाल्याने हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून पळ काढला. 17 ते 19 मे दरम्यान पुण्यात त्याची स्पर्धा आहे, मात्र तो जाऊ शकणार नाही. निखिल हा रोइंगमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे.