शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

National Games 2022: महाराष्ट्र महिला कबड्डी संघ उपविजेता; फायनलमध्ये हिमाचल प्रदेशने मारली बाजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 19:05 IST

सध्या अहमदाबाद येथ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा थरार रंगला आहे.

अहमदाबाद: सध्या अहमदाबाद येथ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा थरार रंगला आहे. स्नेहल शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रमहिला कबड्डी संघ शनिवारी ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेता ठरला आहे. संघाला अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. नॅशनल चॅम्पियन हिमाचल प्रदेश संघाने विजेतेपदाचा बहुमान पटकावला. हिमाचल प्रदेश टीमने फायनलमध्ये महाराष्ट्रावर २७-२२ ने मात केली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र संघाकडून विजयासाठी आंतरराष्ट्रीय रेडर सोनाली शिंगटे आणि पुजा यादवने सर्वोत्तम कामगिरी केली.

 मात्र संघाला अवघ्या पाच गुणांच्या पिछाडीने पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्र संघाने गटातील सामन्यात हिमाचलला धुळ चारली होती. याच पराभवाची परतफेड करताना हिमाचलने आता अंतिम फेरीत महाराष्ट्रावर मात  केली. लक्षणीय बाब म्हणजे महाराष्ट्राच्या संघाच्या खात्यात पहिले पदक आले आहे. महाराष्ट्र महिला संघाने पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकाचा बहुमान पटकावला आहे. यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाची कामगिरी लक्षवेधी ठरली. संघाने विजयी मोहिम कायम ठेवताना यशस्वीपणे अंतिम फेरीचा पल्ला गाठला होता. स्नेहल शिंदेचे कुशल नेतृत्व, सोनाली शिंगटे, पुजा यांची सर्वोत्तम चढाई आणि अंकिता जगताप, रेखा यांच्या सुरेख पकडीच्या बळावर महाराष्ट्राला सामन्यागणिक विजयाची नोंद करता आली. 

महिला खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद - संजय मोकळ, प्रशिक्षक महाराष्ट्र महिला संघाने बलाढ्य संघाला धुळ चारत अंतिम फेरी गाठली होती. यादरम्यान झालेल्या प्रत्येक सामन्यात महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद ठरली. त्यामुळे संघाला रौप्यपदकाचा बहुमान मिळवता आला. सुवर्णपदकासाठी संघाचा प्रयत्न काहीसा अपुरा पडला. मात्र, या पदकाने आमचा आत्मविश्वास दुणावला आहे, अशा शब्दात प्रशिक्षक संजय मोकळ यांनी उपविजेत्या महिला संघावर कौतुकाचा वर्षाव केला.

 

टॅग्स :Kabaddiकबड्डीSilverचांदीMaharashtraमहाराष्ट्रahmedabadअहमदाबादWomenमहिला