शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो : महाराष्ट्राला दुहेरी मुकुट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 7:02 PM

पुण्याच्या वृषभ वाघला वीर अभिमन्यु तर ठाण्याच्या रेश्मा राठोडला जानकी पुरस्कार

भोपाळ : ३८ वी कुमार–मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय खो-खो स्पर्धा भोपाळ, मध्य प्रदेश येथे संपन्न झाली असून या स्पर्धेत गतवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजयाला गवसणी घालत दुहेरी मुकुट मिळवला.  कुमारांच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या महाराष्ट्राने कोल्हापूरचा १२-११ असा एक डाव एक गुणाने सहज पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली. या सामन्यात वृषभ वाघने कर्णधारची खेळी करताना २:००, २:०० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला व राष्ट्रीय स्पर्धेतला सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा वीर अभिमन्यु पुरस्कार मिळवला. राहुल मंडलने २:००, २:०० मि. संरक्षण केले, दिलीप खंडवीने १:३०, २:३० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले, संदेश जाधवने नाबाद १:००, १:२० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले, रूपेश जाधवने तीन गडी बाद केले. कोल्हापूरच्या रोहन शिंगाडेने १:०० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले, मनोज पाटील व आदर्श, गणेशने प्रत्येकी दोन गडी बाद केले.मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकचा ११-९ असा चार मिनिटे राखून दोन गुणांनी दणदणीत विजय साजरा करत अजिंक्यपद मिळवले. महाराष्ट्राच्या रेश्मा राठोडने कर्णधारची खेळी करताना ३:००, २:२० मिनिटे संरक्षण करताना एक बळी घेतला व सरळ राष्ट्रीय स्पर्धेतला सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा जानकी पुरस्कारवर हक्क प्रस्तापित केला. स्नेहल जाधवने २:००, २:१० मिनिटे  संरक्षण केले, प्राजक्ता पवारने १:४०, २:०० मिनिटे  संरक्षण करताना तीन बळी घेतले, दिव्या जाधवने १:००, १:४० मिनिटे संरक्षण करताना एक बळी घेतला, अश्विनी मोरेने नाबाद १:२० मिनिटे संरक्षण करताना एक बळी घेतला. कर्नाटकच्या एल. मोनिकाने २:३०, १:४० मिनिटे  संरक्षण करताना तीन बळी घेतले, के. आर. तेजस्विनीने १:२०, २:२० मिनिटे संरक्षण केले, आर. पी. शितलने १:३० मिनिटे संरक्षण करताना एक बळी घेतला. तत्पूर्वी झालेल्या कुमारांच्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकचा ११-०८ असा एक डाव तीन गुणांनी धुव्वा उडवला व कोल्हापूरने केरळचा १९-१३ असा ६ गुणांनी पराभव केला. तर मुलींच्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीचा ११-०४ असा एक डाव सात गुणांनी धुव्वा उडवला व कर्नाटकने गुजरातचा १२-०५ असा सात गुणांनी पराभव केला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र