राष्ट्रीय कॅरम स्पर्धा : विदर्भ, तामिळनाडू संघांना सांघिक विजेतेपद 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 03:15 PM2019-02-21T15:15:53+5:302019-02-21T15:16:47+5:30

राष्ट्रीय व आंतर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत विदर्भ आणि तामिळनाडू संघांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे सांघिक जेतेपद नावावर केले.

National Carrom Competition: Vidarbha, Tamil Nadu team won title | राष्ट्रीय कॅरम स्पर्धा : विदर्भ, तामिळनाडू संघांना सांघिक विजेतेपद 

राष्ट्रीय कॅरम स्पर्धा : विदर्भ, तामिळनाडू संघांना सांघिक विजेतेपद 

Next

कुडाळ : ४७ व्या राष्ट्रीय व आंतर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत विदर्भ आणि तामिळनाडू संघांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे सांघिक जेतेपद नावावर केले. विदर्भ संघाने पुरुष सांघिक गटात कर्नाटक संघावर विजय मिळवला. महिला आंतरराज्य सांघिक गटात गतविजेत्या तामिळनाडूने आपले वर्चस्व कायम  राखताना अंतिम सामन्यात बिहारचा २-१ असा पराभव केला. 

पुरुष गटात विदर्भाच्या निलेश बनसोड व गुल खान जोडीला कर्नाटकच्या शिव कुमार व अरुण कुमार जोडीने सरळ दोन सेटमध्ये १८-१६, २०-१६ असे सहज पराभूत करून आघाडी घेतली असतानाही एकेरीच्या दोनही सामन्यात कडव्या लढतीनंतर विदर्भने बाजी मारली. विदर्भच्या इर्शाद अहमदने पहिला सेट गमावल्यानंतरही ८-२५, २५-१८, २३-० असा विजय मिळवून सामना बरोबरीत आणला. दुसऱ्या लढतीमध्ये विदर्भच्या निखिल लोखंडेने कर्नाटकच्या एम. विनोदवर २५-१२,६-२२, २५-१५ असा विजय मिळवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत तेलंगणाच्या  महम्मद वसीम व अश्विन कुमार जोडीने तामिळनाडूच्या जी गणेशन व डी डी त्यागराज जोडीसमोर सपशेल नांगी टाकली. त्यांचा २२-१९, २५-३ असा पराभव करत तामिळनाडूने सुरुवातीलाच आघाडी घेतली. मात्र तेलंगणाच्या एस आदित्यने तमिळनाडूच्या एम सुमनला २५-२, २५-१० असा तर तेलंगणाच्याच महम्मद अहमदने तामिळनाडूच्या  टी कुमारला २५-१०, २५-५ अशी मात करत आपल्या संघाला तिसऱ्या क्रमांकाचे पदक मिळवून दिले.  

                                                                                      
महिला आंतरराज्य सांघिक गटात पहिल्या एकेरी सामन्यात बिहारच्या खुशबू राणीने तामिळनाडूच्या एस. रोशनीचा २१-१५,२३-१० असा पराभव केला. दुसऱ्या एकेरी सामन्यात तामिळनाडूच्या एल. एम्सवर्धिनीने बिहारच्या ममता कुमारिचा १६-१२, २४-१२ असा पराभव करत १-१ अशी बरोबरी केली .निर्णायक दुहेरीच्या सामन्यात तामिळनाडूच्या एम ख्वाझीमा व बी. शोभिका यांनी बिहारच्या संध्या सिंह व गुरिया राणी सिंग या जोडीचा २५-७,२२-१७ असा पराभव करत तामिळनाडूला अजिंक्यपद मिळवून दिले .                                                                                                                    
तिसऱ्या क्रमांक करीता झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने आंध्रप्रदेशचा २-१ असा पराभव केला . महाराष्ट्राच्या स्नेहा मोरेने आंध्रच्या ए भवानीचा चुरशीच्या सामन्यात २५-०९,१०-२२,२५-०४ असा पराभव करत संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात आंध्रच्या एम.एस.हरिकाने महाराष्ट्राच्या प्रीती खेडेकरचा ७-२५,२२-११,१७-१५ असा पराभव करत १-१ अशी बरोबरी केली. निर्णायक दुहेरीच्या सामन्यात महाराष्टाच्या मैत्रेयी गोगटे व पुष्करणी भट्टड या जोडीने आंध्रच्या तनुजा व हुस्न समिरा या जोडीचा १८-१५,२५-०० असा सरळसरळ सेटमध्ये पराभव करत महाराष्ट्राला तिसरा क्रमांक प्राप्त करून दिला.

Web Title: National Carrom Competition: Vidarbha, Tamil Nadu team won title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.