National Boxing Championship: Sonia Chahal, Jyoti Gulia in quarter finals | राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा : सोनिया चहल, ज्योती गुलिया यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक
राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा : सोनिया चहल, ज्योती गुलिया यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

कन्नूर :  वर्ल्ड चॅम्पियनशिप (2018 ) रौप्यपदक विजेती सोनिया चहल (57 किलो) आणि युवा विश्व अजिंक्यपद ज्योती गुलियाने (51 किलो) केरळच्या कन्नूरच्या मुंडयाद इंडोर स्टेडियमवर चौथी एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.तर, नंदिनीला (81 किलो) पराभवाचा सामना करावा लागला.

चहलने 2016 साली 57 किलो वजनीगटात सुवर्णपदक तर, 2017 मध्ये कांस्यपदक मिळवले होते. तिने संध्याराणी देवीला 4-1 असे नमविले. तिस-या फेरीत मी हळूपणे सुरुवात केली पण, नंतर गुणांची कमाई केली. त्यामुळे माझ्या कामगिरीने आनंदी आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्यास ऑलिम्पिक क्वॉलिफायर्ससाठी माझा आत्मविश्‍वास दुणावेल. त्यामुळे सुवर्णपदक मिळवण्याचा माझा प्रयत्न असे चहलने सांगितले.

युथ ऑलिम्पियन व युथ वर्ल्ड चॅम्पियन ज्योती गुलियाने (51 किलो) रेल्वेचे प्रतिनिधित्व करताना चंदीगढची इंडिया ओपन रौप्यपदक विजेत्या मोनिकाला गुलियाने 3-2 असे नमविले. कोलोन वर्ल्ड कप सुवर्णपदक विजेता मीनाकुमारी देवी ही 54 किलो गटात गतविजेती होती. उत्तरप्रदेशच्या कनिका चौधरीविरुद्ध तिस-या फेरीत आरएससी नियमानुसार तिला विजयी घोषित करण्यात आले.

कोलोन विश्वचषक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती प्विलाओ बासुमात्रीनेही दिल्लीच्या आरती रावळविरुद्ध 64 किलो वजनी गटात सुरुवात केली. 2019 च्या राष्ट्राध्यक्ष चषक (इंडोनेशियातील) सुवर्णपदक विजेत्या मोनिकाने हिमाचल प्रदेशच्या ज्योतिका बिष्टवर 5-0 असा 48 किलो वजनीगटात चमक दाखवली.

पंजाब आणि चंदीगडच्या बॉक्सरने नेहमीप्रमाणे चमकदार प्रदर्शन केले. मिनाक्षी (48 किलो), रिया राणी (54 किलो), मनु बदन (75 किलो) आणि परमिंदर कौर (81 किलो) यांनी पंजाबला विजयी स्तंभात स्थान दिले. चंडीगडच्या रितूने जम्मू-काश्मीरच्या नेहा भगतवर दुस-या फेरीमध्ये आरएससीच्या माध्यमातून 57 किलोग्रॅममध्ये विजय मिळवला तर, नीमाने (64 किलो) महाराष्ट्राच्या सिमरन मेंडनवर 5-0 असा विजय मिळविला. 81 किलो वजनीगटात चंडीगढच्या नंदिनी उत्तरप्रदेशच्या शैली सिंगकडून 1-4 असे पराभूत केले. नंदिनी ही 2019 च्या महिला जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत होती.6 डिसेंबरपासून बाद फेरीची सुरुवात होणार असून अंतिम सामने 8 डिसेंबरला होणार आहेत.

Web Title: National Boxing Championship: Sonia Chahal, Jyoti Gulia in quarter finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.