शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

मुरली कुमारचा दबदबा

By admin | Updated: March 26, 2015 02:04 IST

भारतीय नौदलाचा बलाढ्य व आंतरराष्ट्रीय दर्जाचा शरीरसौष्ठवपटू मुरली कुमार याने एकहाती वर्चस्व राखताना गिरणगाव ‘श्री’ स्पर्धेचा किताबावर कब्जा केला.

मुंबई : भारतीय नौदलाचा बलाढ्य व आंतरराष्ट्रीय दर्जाचा शरीरसौष्ठवपटू मुरली कुमार याने एकहाती वर्चस्व राखताना गिरणगाव ‘श्री’ स्पर्धेचा किताबावर कब्जा केला. त्याचवेळी बोडीवर्क शॉपच्या अभिषेक खेडेकर याने अप्रतिम प्रदर्शन करताना ‘बेस्ट पोझर’ किताबवर नाव कोरले.मुंबई बॉडीबिल्डींग असोसिएशन, ग्रेटर बॉम्बे बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि सबर्बन बॉडीबिल्डींग अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रळ येथील नरे पार्क मैदाना रंगलेल्या या स्पर्धेत एकूण ५० शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या पीळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन केले. एकूण सहा वजनी गटात झालेल्या या स्पर्धेत मुरली कुमार ८० किलो वजनी गटातून सहभागी झाला होता. या गटातून पाठारे जिमच्या महेंद्र चव्हाण याने मुरलीला कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र अनुभवी मुरलीने आपल्या अनुभवाच्या जोरावर बाजी मारुन गटविजेतेपदासह अंतिम फेरीत धडक मारली.स्पर्धा किताबाच्या अंतिम फेरीत त्याच्या समोर ७५ किलो व्जनी गटाच्या सुनील जाधवचे मुख्य आव्हान होते. मात्र यावेळी मुरलीने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखताना सुनीलला कोणतीही संधी न देता सहज बाजी मारली. दरम्यान तत्पुर्वी झालेल्या बेस्ट पोझरच्या लढतीमध्ये अभिषेक खेडेकरने अप्रतिम प्रदर्शन करताना प्रेक्षकांमध्ये धम्माल उडवून दिली. (क्रीडा प्रतिनिधी) ५५ किलो: १. नितीन शिगवण (वक्रतुंड जिम); २. किशोर कदम (परब फिट ); ३. सचिन लोखंडे (पाठारे जिम)६० किलो: १. सुनील सपकाळ (आर. एम. भा . व्यायम शाळा); २. अरुण पाटील (जय भवानी व्यायाम शाळा); ३. सचिन पवार (बाल मित्र व्यायामशाळा ).६५ किलो : विलास घडवले (बॉडी वर्क शॉप ); नितीन म्हात्रे (पॉवर झोन);प्रताप घोलप ((आर. एम. भा . व्यायम शाळा).७० किलो : संतोष भरणकर (परब फिट); सुशील मुरकर (आर के एम जिम); सिद्धेश धनावडे (व्ही. फिटनेस).७५ किलो : सुनील जाधव (माय फिटनेस); भास्कर कामळी (कीर्ती जिम); अब्दुल अन्सारी (पाठारे जिम)