महाराष्ट्राच्या कियारा बंगेरानं जागतिक शालेय स्पर्धेत जिंकली दोन पदकं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 19:29 IST2021-09-29T19:28:57+5:302021-09-29T19:29:19+5:30
मुंबईच्या १५ वर्षीय कियारा बंगेरा हिनं सर्बिया येथे नुकत्याच पार पडलेल्या १५ वर्षांखालील जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली.

महाराष्ट्राच्या कियारा बंगेरानं जागतिक शालेय स्पर्धेत जिंकली दोन पदकं
मुंबईच्या १५ वर्षीय कियारा बंगेरा हिनं सर्बिया येथे नुकत्याच पार पडलेल्या १५ वर्षांखालील जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारताचे १६ खेळाडू सहभागी झाले होते आणि त्यांनी ३ रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली. महाराष्ट्रातून या स्पर्धेत सहभागी झालेली कियारा एकमेव खेळाडू होती आणि तिनं दोन पदकं जिंकून विक्रम केला. मुंबईच्या धिरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शालेत ती शिकते.
तिनं ४०० मीटर फ्रीस्टाईल आणि २०० मीटर बटरफ्लाय स्टोक प्रकारात अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले. ''परदेशात पदक जिंकल्याचा अभिमान वाटतोय,''असे मत कियारानं व्यक्त केलं. कियारानं या यशाचं श्रेय कुटुंबीय, प्रशिक्षक आणि शाळेला दिले.