मुंबई सुसाट : कोलकाता नाईट रायडर्सवर ६ विकेटने विजयी

By Admin | Updated: April 29, 2016 02:39 IST2016-04-29T02:39:59+5:302016-04-29T02:39:59+5:30

कर्णधार रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांच्या वादळी भागीदारीच्या बळावर मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज येथे कोलकाता नाईट रायडर्सचा ६ गडी राखून पराभव केला.

Mumbai Suits: Kolkata Knight Riders won by 6 wickets | मुंबई सुसाट : कोलकाता नाईट रायडर्सवर ६ विकेटने विजयी

मुंबई सुसाट : कोलकाता नाईट रायडर्सवर ६ विकेटने विजयी

मुंबई : कर्णधार रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांच्या वादळी भागीदारीच्या बळावर मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज येथे कोलकाता नाईट रायडर्सचा ६ गडी राखून पराभव केला.
कर्णधार गौतम गंभीर (५९) याच्या अर्धशतकाच्या बळावर केकेआरने ५ बाद १७४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात रोहित शर्मा (नाबाद ६८) आणि पोलार्ड (नाबाद ५१) यांनी केलेल्या पाचव्या गड्यासाठी ३0 चेंडूंतच ७0 धावांची तडाखेबंद नाबाद भागीदारीच्या बळावर मुंबई इंडियन्सने १८ षटकांत ४ बाद १७८ धावा करत विजयी लक्ष्य गाठले. रोहितने अंबाती रायुडू (३२) याच्या साथीने दुसऱ्या गड्यासाठी नाबाद ५९ धावांची भागीदारी केली. रोहितने ४९ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आणि २ षटकार मारले, तर पोलार्डने अवघ्या १७ चेंडूंच्या खेळीत ६ षटकार आणि दोन चौकार ठोकले. तत्पूर्वी, कर्णधार कोलकाता नाईट रायडर्सने ५ बाद १७४ धावा ठोकल्या. गौतम गंभीरने ४५ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह ५९ धावांची खेळी केली. याशिवाय रॉबिन उथप्पा (३६) याच्या साथीने पहिल्या गड्यासाठी ६९ आणि सूर्यकुमार यादव (२१) याच्या साथीने तिसऱ्या गड्यासाठी ४४ धावांची भागीदारी करताना केकेआरला चांगली सुरुवात करून दिली. (वृत्तसंस्था)

Web Title: Mumbai Suits: Kolkata Knight Riders won by 6 wickets