शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

 मुंबई शहर कबड्डी स्पर्धा : श्री गणेश, लालबाग स्पोर्ट्स यांची आगेकूच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 9:15 PM

दुसऱ्या फेरीच्या सामन्यात जय भारत क्रीडा मंडळाने अत्यंत चुरशीच्या लढतीत बालवीर क्रीडा मंदिराचा प्रतिकार २८-२६ असा मोडून काढला.

 जय भारत क्रीडा मंडळ, साऊथ कॅनरा स्पोर्ट्स क्लब, श्री गणेश क्लब, लालबाग स्पोर्ट्स, जय खापरेश्वर क्रीडा मंडळ, नवोदित संघ यांनी मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत आणि मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” कुमार गटात तिसरी फेरी गाठली. वडाळा – मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरू असलेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात जय भारत क्रीडा मंडळाने अत्यंत चुरशीच्या लढतीत बालवीर क्रीडा मंदिराचा प्रतिकार २८-२६ असा मोडून काढला. साहिल राणे, दिशांत डांगे यांची आक्रमक चढाया त्याला रोहित कदम यांने दिलेली पकडीची उत्तम साथ यांच्या जोरावर बालवीरने पहिल्या डावात १७-०९ अशी भक्कम आघाडी मिळविण्यात यश मिळविले होते. पण दुसऱ्या डावात ही आघाडी राखण्यात व संघाला विजयी त्यांना अपयश आले. दुसऱ्या डावात जय भारतच्या निखिल पाटील, रोहन पाटील यांनीं धारदार आक्रमण करीत बालवीरचा बचाव खिळखिळा करीत भराभर गुण वसूल केले. शुभम मटकरने धाडशी पकडी करीत त्यांना छान साथ दिल्यामुळेच जय भारताने हा अशक्य वाटणाऱ्या विजयाला गवसणी घातली.  साऊथ कॅनरा स्पोर्ट्सने सिद्धीप्रभाला २९-२७ असे चकवित तिसरी फेरी गाठली. गणेश सिंग, अमन शेख यांच्या दमदार चढाया त्याला नितीन मंडलची मिळालेली पकडीची बहुमोल साथ याच्या जोरावर साऊथ कॅनराने विश्रांतीलाच १४-०५अशी आश्वासक आघाडी मिळविली होती. उत्तरार्धात सिद्धिप्रभाच्या ऋतुराज साळुंखे, ओमकार ढवळे यांना बऱ्यापैकी सूर सापडला. पण वेळेचे गणित त्यांना साधता न आल्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. श्री गणेश स्पोर्ट्स क्लबने सुनील स्पोर्ट्स क्लबला २९-२७ अशा २ गुणांच्या फरकाने नमवित आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली. शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने खेळला गेलेल्या सामन्यात विश्रांतीला १२-११ अशी नाममात्र आघाडी श्री गणेशकडे होती. हीच आघाडी कायम राखत गणेशने हा विजय साकारला. अमेय बिरमोळे, अजित कडपात श्री गणेशकडून, तर सुनीलकडून आयुष्य सणस, सुहास डोंगरे सुनीलकडून उत्तम खेळले.  लालबाग स्पोर्ट्स क्लबने विश्रांतीतील १८-१२ अशा आघाडी नंतर शेवटी जय ब्राह्मणदेव क्रीडा मंडळाचा ३१-२४ असा पाडाव केला. विशाल पाठक, किरण जाधव या विजयाचे शिल्पकार ठरले. अमित कळंबे, सौरभ डिके पराभूत संघाकडून छान खेळले. जय खापरेश्वर क्रीडा मंडळाने अमर संदेशला ४०-२८ असे नमविलें ते राज येरंडे, विश्वजित जाधव, सुजल शिंदे यांच्या चतुरस्त्र खेळामुळे. अमर संदेशचे विवेक करगुटकर, मृणाल गुरव चमकले. नवोदित संघाने सक्षम क्रीडा मंडळाचा ४४-३० असे पराभूत करीत तिसरी फेरी गाठली. अजेय शिंदे, प्रणय राणे, मृगेद लाड यांच्या उत्कृष्ट खेळाला या विजयाचे श्रेय जाते. सक्षम कडून शुभम पवार, अनिकेत परमार यांनी बऱ्यापैकी लढत दिली.   कुमार गटाचे इतर निकाल संक्षिप्त :- १)सम्राट क्रीडा मंडळ विजयी विरुद्ध अष्टविनायक क्रीडा मंडळ (५०-२९); २) न्यू बर्डस स्पोर्ट्स वि वि अमर क्रीडा मंडळ (४७-२६); ३)विहंग क्रीडा मंडळ वि वि शिवमुद्रा प्रतिष्ठान (५१-२५); ४)खडा हनुमान सेवा मंडळ वि वि सूर्यकांत व्यायाम मंडळ (३८-२२).

टॅग्स :Kabaddiकबड्डीMumbaiमुंबई