मुंबई इंडियन्सची फलंदाजी ढेपाळली, 3 बाद 45
By Admin | Updated: April 14, 2015 20:47 IST2015-04-14T20:45:02+5:302015-04-14T20:47:50+5:30
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या मुंबई इंडियन्सची फलंदाजी ढेपाळली असून 10.4 षटकांत अवघ्या 45 धावा करत त्यांनी 3 गडी गमावले आहेत.

मुंबई इंडियन्सची फलंदाजी ढेपाळली, 3 बाद 45
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 14 - टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत चांगली सुरूवात करणा-या मुंबई इंडियन्सची फलंदाजी ढेपाळली असून 10.4 षटकांत अवघ्या 45 धावा करत त्यांनी 3 गडी गमावले आहेत. सध्या अँडरसन (6) आणि पोलार्ड (0) खेळत असून चांगली खएळी करून मोठी धावसंख्या उभारयाची जबाबादारी त्यांच्यावर आहे. राजस्थान रॉयल्सतर्फे धवल कुलकर्णी, स्टुअर्ट बिन्नी व प्रवीण तांबेने प्रत्येकी 1 बळी टिपला.
मुंबईने पहिल्या 2.2 षटकांत बिनबाद 22 अशी चांगली सुरूवात केली खरी, मात्र अॅरॉन फिंच 10 धावावंर खेळताना जखमी होऊन तंबूत गेला आणि त्यानंतर मुंबईचे इतर फलंदाज पटापट बाद झाल्याने मुंबईचा डाव ढेपाळला. पार्थिव पटेल 16, उन्मुक्त चंद 12 तर कर्णधार रोहित शर्मा अवघा शून्यावर बाद झाला.