शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मोना मेश्राम भारतीय महिला क्रिकेट संघात

By admin | Updated: January 22, 2017 04:21 IST

विदर्भ संघाची कर्णधार मोना मेश्राम हिला पुढील महिन्यात कोलंबोत होणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता सामन्यांसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

नवी दिल्ली : विदर्भ संघाची कर्णधार मोना मेश्राम हिला पुढील महिन्यात कोलंबोत होणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता सामन्यांसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. ती जखमी स्मृती मानधना हिचे स्थान घेईल.स्मृती आॅस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळताना जखमी झाली. यामुळे मिताली राजच्या नेतृत्वाखालील १४ सदस्यांच्या भारतीय संघात मोनाला स्थान देण्यात येत असल्याचे बीसीसीआयने शनिवारी जाहीर केले.बीसीसीआयने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार ७ फेब्रुवारीपासून कोलंबोत खेळल्या जाणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत स्मृती खेळू शकणार नाही. मोनाला १४ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. पात्रता फेरीत भारताला अ गटात यजमान श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि थायलंड सोबत स्थान देण्यात आले आहे. ब गटात द. आफ्रिका, पाकिस्तान, बांगला देश, स्कॉटलंड आणि पापुआ न्यूगिनी यांचा समावेश असेल. भारताला ७ फेब्रुवारी रोजी लंकेविरुद्ध पहिला पात्रता सामना खेळायचा आहे. त्याआधी द. आफ्रिकेविरुद्ध एक सराव सामना होणार आहे. विश्वचषकाचे आयोजन ब्रिटनमध्ये २६ जून ते २३ जुलै या कालावधीत होईल. (वृत्तसंस्था)