शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
6
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
7
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
8
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
9
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
10
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
11
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
12
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
13
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
14
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
15
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
16
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
17
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
18
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
19
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
20
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पुरुष, महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: February 18, 2016 06:30 IST

भारतीय बॅडमिंटनपटूंनी जबरदस्त कामगिरी करीत सिंगापूरचा फडशा पाडला. पुरुष संघाने सिंगापूरवर ५-० ने मात केली.

हैदराबाद : भारतीय बॅडमिंटनपटूंनी जबरदस्त कामगिरी करीत सिंगापूरचा फडशा पाडला. पुरुष संघाने सिंगापूरवर ५-० ने मात केली. या शानदार सुरुवातीनंतर भारताने बॅडमिंटन आशियाई टीम चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ‘अ’ गटात भारतासोबतच चीनचाही समावेश आहे. या स्पर्धेत तीन एकेरी आणि दोन दुहेरी सामने आहेत. भारतासाठी किदांबी श्रीकांतने सुरुवात केली. गचीबाउली स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्याने झि लियांग डेरेक वॉँगचा २१-१६, १२-२१, २१-१३ ने पराभव केला. वॉँगने संघर्ष केला. मात्र, नवव्या क्रमांकावरील श्रीकांतने पुनरागमन करीत सामना जिंकला. दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात, अजय जयरामने किन यू लो याचा २१-११, २१-१८ ने पराभव केला. त्यानंतर भारताने दोन्ही दुहेरीतील सामने जिंकले. मनू अत्री आणि सुमित रेड्डी या जोडीने टॅरी ही आणि किन हिन लो या जोडीचा २१-१५, २१-१४ ने पराभव केला.महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या पीव्ही सिंधू हीने सिंगापूरच्या शियायू लियांगला २१-१७, २१-११ अशी मात दिली. शायायूने पहिल्या गेममध्ये कडवी झुंज दिली. मात्र सिंधूने दुसरा गेम सहज खिशात घालत विजय मिळविला. सिंधूने दुहेरीत सिक्की रेड्डी हीच्या साथीत सिगांपूरच्या जिया मिंग क्रिस्टल वोंग व जिया मिन यिओ या जोडीवर २१-८, २१-१४ असा विजय मिळवित आगेकूच केली.