शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

मेवेदरच ठरला चॅम्पियन

By admin | Updated: May 4, 2015 00:58 IST

फ्लॉईड मेवेदर याने रविवारी येथे बॉक्सिंग खेळाच्या इतिहासाच्या ‘शतकातील महामुकाबल्यात’ मॅनी पॅकियो याला पराभूत करीत जगातील आपणच सर्वोत्तम वेल्टरवेट बॉक्सर आहोत

लॉस वेगास : फ्लॉईड मेवेदर याने रविवारी येथे बॉक्सिंग खेळाच्या इतिहासाच्या ‘शतकातील महामुकाबल्यात’ मॅनी पॅकियो याला पराभूत करीत जगातील आपणच सर्वोत्तम वेल्टरवेट बॉक्सर आहोत हे सिद्ध केले. बॉक्सिंगच्या विश्वातील महानायक ठरणाऱ्या मेवेदरला २0 कोटी डॉलरचे बक्षीस मिळाले. तथापि, हा मुकाबला अपेक्षेनुरूप चित्तथरारक झाला नाही. मेवेदरने फिलिपाइन्सच्या आपल्या प्रतिस्पर्ध्याला सहजपणे नमवले. त्यामुळे काट्याची लढत होईल या अपेक्षेने आलेल्या एमजीएम ग्रँडमध्ये पोहोचलेल्या १७ हजार प्रेक्षकांची घोर निराशा झाली.या दोघांतील महामुकाबला आतापर्यंतचा सर्वाधिक बक्षीस रकमेचा म्हणजे ४0 कोटी डॉलर असल्याने या लढतीकडे सर्व जगताचे लक्ष लागून राहिले होते.या लढतीवर सर्वांत मोठी अशी ४0 कोटी डॉलरची बक्षीस रक्कम होती आणि पैशांच्या तुलनेत बॉक्सिंग इतिहासातील सर्वांत जास्त ही आकर्षक लढत होती.पॅकियोने सुरुवातीला आक्रमक धोरण अवलंबले आणि पहिल्या फेरीत त्याने मेवेदरच्या हनुवटीवर जोरदार ठोशे लगावले; परंतु तो त्याचा हा वेग लढतीच्या १२ व्या फेरीपर्यंत कायम ठेवू शकला नाही. मेवेदरने त्याच्या उंचीचा फायदा उठवला आणि काऊंटर पंच करण्यात यशस्वी ठरला. मेवेदरने शनिवारी झालेल्या या लढतीनंतर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पुढील लढतीनंतर निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले. हॉलीवूडचे काही दिग्गजही याप्रसंगी उपस्थित होते. त्यात निर्देशक क्लाइंट ईस्टवूड, अभिनेता रॉबर्ट डि निरो, जॉन वोईट, डेंजेल वॉशिंगटन, ब्रॅडली कूपर, एनबीए स्टार मॅजिक जॉन्सन आदींचा समावेश होता. वर्ल्डचॅम्पियन मेवेदर हा सर्वाधिक कमाई करणारा बॉक्सर आहे. त्याची संपत्ती सुमारे २७ अब्ज इतकी आहे, तर त्याच्यासोबत पराभूत झालेल्या पॅकियो याची संपत्ती सुमारे २२ अब्ज आहे. यापूर्वी २00२ मध्ये माईक टायसन आणि लेनोक्स लुईस यांच्यात तर २0११ मध्ये व्लादिमीर कल्चिको आणि डेव्हिड यांच्यात बॉक्सिंगमधील महामुकाबला झाला होता.(वृत्तसंस्था)