सामना संपल्यावर मेरी कोमने हात मिळवण्यास दिला नकार, नेमकं घडलं तरी काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 15:44 IST2019-12-28T15:43:26+5:302019-12-28T15:44:54+5:30

सामना जिंकल्यावर मेरी चांगलीच भडकलेली पाहायला मिळाली.

Mary Kom not shaking hands with Nikhat Zareen after the bout | सामना संपल्यावर मेरी कोमने हात मिळवण्यास दिला नकार, नेमकं घडलं तरी काय...

सामना संपल्यावर मेरी कोमने हात मिळवण्यास दिला नकार, नेमकं घडलं तरी काय...

मुंबई : टोकिओमध्ये पुढील वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रता फेरीचे सामने आज खेळवण्यात आले. यावेळी भारताची विश्वविजेती मेरी कोमही खेळत होती. पण सामना जिंकल्यावर मेरी चांगलीच भडकलेली पाहायला मिळाली.

या स्पर्धेच्या ५१ किलो वजनी गटामध्ये मेरी आणि निखत झरीन यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. हा सामना मेरीने ९-१ अशा मोठ्या फरकाने जिंकला. पण या विजयानंतर मेरीने झरीनबरोबर हात मिळवण्यास नकार दिल्याचे पाहायला मिळाले.

या सामन्यानंतर मेरी म्हणाली की, " तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचा मान ठेवता तेव्हाच तुम्हाला सन्मान मिळतो. झरीनने जर माझा मान ठेवला नाही, तर मी का तिच्याशी हस्तांदोलन करू. मला अशा प्रकारची माणसं आवडत नाहीत. तुम्हाला जे सिद्ध करायचे आहे ते रिंगमध्ये करा, रिंगच्या बाहेर नाही." 



 

Web Title: Mary Kom not shaking hands with Nikhat Zareen after the bout