शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

महाराष्ट्र केसरी गट लढतींत मल्ल सागर मारकड, रणजित नलावडे यांनी गाजविला दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:57 IST

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील गट लढतींत मल्ल सागर मारकड, रणजित नलावडे यांनी दिवस गाजविला. सागर मारकडने माती गटात स्पर्धेतील पहिले सुवर्ण जिंकत यजमान पुणे संघाचे वर्चस्व गाजवले. तर कोल्हापूरचा राष्ट्रकुलपदक विजेता रणजितने विक्रमी ९ वे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. गादी विभागात ५७ किलो गटात कोल्हापूरच्या विजय पाटीलने साताºयाच्या प्रदिप सुळचा ११-० गुणांनी पराभव करुन विजेतेपद जिंकले़

गोरख माझिरेभूगाव : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील गट लढतींत मल्ल सागर मारकड, रणजित नलावडे यांनी दिवस गाजविला. सागर मारकडने माती गटात स्पर्धेतील पहिले सुवर्ण जिंकत यजमान पुणे संघाचे वर्चस्व गाजवले. तर कोल्हापूरचा राष्ट्रकुलपदक विजेता रणजितने विक्रमी ९ वे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. गादी विभागात ५७ किलो गटात कोल्हापूरच्या विजय पाटीलने साताºयाच्या प्रदिप सुळचा ११-० गुणांनी पराभव करुन विजेतेपद जिंकले़भूगाव येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत बुधवारी सकाळपासून चितपट लढतींचा आनंद कुस्तीशौकिनांना मिळाला. सकाळच्या सत्रात ५७ किलो माती गटात राष्ट्रीयपदक विजेता सोलापूरचा ज्योतिबा अटकळने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करीत अंतिम फेरीत धडक मारली. त्यांच्यापुढे इंदापूरमध्ये सराव करणाºया सागर मारकडचे आव्हान होते. मॅटवरील राष्ट्रीय विजेता ज्योतिबाकडे संभाव्य विजेते गणला गेला होता. मात्र, मातीवर सराव करणाचा अनुभव असणाºया २१ वर्षीय सागरने सलग दुसºया वर्षी गटातील सुवर्णपदकावर नाव कोरले.पहिल्या फेरीत काका पवारच्या आंतरराष्ट्रीय संकुलात सराव करणाºया १-० ची आघाडी घेतली होती. दोघेही नकारात्मक कुस्ती करत असल्याने सुरुवात रटाळ झाली. निर्णायक दुसºया फेरीत मारकडने पहिल्याच मिनिटाला कलाजंग डाव करीत आक्रमक पवित्रा घेतला. तो असफल होताच त्याने भारद्वाज डावावर ४ गुणांची कमाई करीत पुणे जिल्ह्याच्या पदक तक्यात पहिले खाते उघडले. वडील मारुती मारकड यांच्या मार्गदर्शनाद्वारे सागरने आपला ठसा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत उमटविला आहे. रिपेचेसच्या कांस्यपदकाच्या लढतीत उस्मानाबादच्या दत्तात्रस मेटे आणि पुण्याच्या प्रशांत साठेने विजय संपादन केला. उस्मानाबादच्या हनुमंत पुरीने एकतर्फी खेळ करीत ७९ माती विभागातील अजिक्यपद कमावले. अहमदनगरच्या अजित शेळकेला८-४ गुणांनी नमवून हनुमंतने सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. सोलापूरच्या नंदकुमार काकडे, पुणेच्या नागेश राक्षेने कांस्यपदके मिळविली.रणजीतची शुभमवर मात-पुण्यापाठोपाठ कोल्हापूर आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर रणजीतने ७९ किलो मॅट गटात आपली हुकुमत कायम राखली. नाशिकच्या शुभम शिंदेवर त्याने९-३ गुणांनी मात करीत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. पहिल्या फेरीत छडी टांगवर धोकादायक स्थिती निर्माण करीत रणजीतने चार गुण वसूल केले. दुसºया फेरीतही भारद्वाजवर ४ गुणांची कमाई करीत त्याने आपला विजय निश्चित केला. शेवटच्या मिनिटाला थकलेल्या रणजितला मागे ढकलित शुभमने ३ गुण मिळवले. २००८ सांगलीमध्ये रणजितने पहिले सुवर्णपदक राज्य अजिंक्यपद स्पर्धेत जिंकले होते. तेव्हापासून त्याचा सुवर्ण झंझावत सुरूच राहिला आहे. फ्री स्टाईल प्रकारात ट्रिपल हॅट्ट्रिकचा करिश्मा करणाºया रणजितने ग्रिकोरोमन प्रकारातही राज्य स्पर्धेत पदकाचा चौकार झळकविला आहे.

टॅग्स :Puneपुणे