शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला ४ विजेतेपदांची संधी

By admin | Updated: April 26, 2015 01:30 IST

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आणि शिवप्रेमी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने सांगली येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने जबरदस्त दबदबा राखला आहे.

मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आणि शिवप्रेमी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने सांगली येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने जबरदस्त दबदबा राखला आहे. सब-ज्युनियर गट पाठोपाठ वरिष्ठ गट फेडरेशन चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत देखील महाराष्ट्राने धडक मारल्याने महाराष्ट्राला स्पर्धेत तब्बल चार विजेतेपद पटकावण्याची संधी मिळाली आहे.खो-खो फेडरेशन आॅफ इंडियाच्या मान्यतेने सुरु असलेल्या या स्पर्धेत सब-ज्युनियर गटात महाराष्ट्राच्या किशोर संघाने बलाढ्य कोल्हापूरला धक्का देताना २१-११ असा विजय मिळवला. मध्यंतराला महाराष्ट्राने नाममात्र आघाडी घेताना ९-८ असे वर्चस्व मिळवले. यानंतर मात्र महाराष्ट्राने आपला जलवा दाखवत १२-३ अशी झेप घेत सामना जिंकला. कर्णधार काशिलिंग हिरेकुर्ब, वृषभ वाघ यांनी जबरदस्त आक्रमण व संरक्षण करताना संघाला अंतिम फेरी गाठून दिली. किशोरी गटात महाराष्ट्राने दणदणीत विजय मिळवताना पश्चिम बंगालचा १२-९ असा १ डाव व ३ गुणांनी फडशा पाडला. साक्षी वाघ, मयुरी मुत्याल, प्राजक्ता पवार आणि ज्ञानेश्वरी गाढे यांनी निर्णायक खेळ करताना महाराष्ट्राला विजयी केले.वरिष्ठ गटाच्या फेडरेशन चषक स्पर्धेत बलाढ्य महाराष्ट्राने पुरुष गटात अपेक्षित कामगिरी करताना आंध्र प्रदेशचा १७-४ असा १ डाव व १३ गुणांनी सफाया केला. विशेष म्हणजे पहिल्याच डावात महाराष्ट्राने एकतर्फी आघाडी घेतल्यानंतर आंध्र प्रदेशने सामन्यातून माघार घेतली. यावरुनच महाराष्ट्राचा धडाका लक्षात येतो. महिला गटात देखील महाराष्ट्राने धमाकेदार विजय मिळवताना पश्चिम बंगालाचा २२-१० असा एक डाव व १२ गुणांनी चुराडा केला. मध्यंतराला ८-४ अशी आघाडी घेतल्यानंतर महाराष्ट्राने आक्रमक खेळ करताना बंगालला डोके वर काढण्याची एकही संधी न देता सहज बाजी मारली. सुप्रिया गाढवे, श्वेता गवळी आणि शितल भोर यांनी शानदार अष्टपैलू खेळ करताना महाराष्ट्राला अंतिम फेरी गाठून दिली.