'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण?, मधुर भंडारकर यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 01:22 PM2021-08-19T13:22:51+5:302021-08-19T13:25:07+5:30

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून डौलानं तिरंगा फडकावणाऱ्या नीरज चोप्राच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा रंगू लागली आहे.

Madhur Bhandarkar asks gold-medalist Neeraj Chopra about his interest in acting, he reply... | 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण?, मधुर भंडारकर यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण?, मधुर भंडारकर यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

googlenewsNext

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून डौलानं तिरंगा फडकावणाऱ्या नीरज चोप्राच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा रंगू लागली आहे.  भालाफेकपटू नीरजनं टोकियोत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले. भारताच्या ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासातील १२५ वर्षांतील हे अॅथलेटिक्समधील पहिलेच पदक ठरले. २००८नंतर पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत राष्ट्रगीत वाजले. या ऐतिहासिक पदकानंतर नीरज चोप्राचा सगळीकडे सत्कार केला जात आहे. प्रसिद्ध दिग्दर्शन मधुर भंडारकर यांनी नुकतीच नीरज चोप्राची भेट घेतली. नवी दिल्लीत ही भेट झाली आणि भंडारकर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर गोल्डन बॉयसोबतचा फोटो  पोस्ट केला. त्यानंतर नीरजच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा सुरू झाली आहे.

Video : लॉर्ड्सवर टीम इंडियाचा विजयी जल्लोष अन् इंग्लंड समर्थक समालोचकांना काय बोलावं हेच सुचेना!

नीरज सोबतच्या भेटीदरम्यान भंडारकर यांनीही त्याला बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत विचारले होते. ते म्हणाले, 'नीरज तू सुपरस्टार झाला आहेस आणि तुझे लाखो चाहते आहेत. तू गुड लुकींगही आहेस. त्यामुळे चित्रपटात काम करण्याचा विचार केला आहेस का?' त्यावर नीरज म्हणाला, मला अभिनय करण्याची इच्छा नाही, मला खेळावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. 

सुवर्णपदक विजेत्या नीरजनं जागतिक भालाफेक क्रमवारीत १४ स्थानांनी झेप घेताना थेट दुसरा क्रमांक पटकवला आहे. ( India’s Neeraj Chopra to move up 14 places to second place in the latest World Athletics Rankings) त्याच्या खात्यात आता १३९५ गुण जमा झाले असून जर्मनीचा जोहानेस वेट्टर हा १३९६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. विशेष म्हणजे वेट्टरला ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. मार्सिन क्रुकोवस्की ( १३०२) तिसऱ्या, टोकियोत रौप्यपदक जिंकणारा जाकूब व्हॅड्लेजच ( १२९८०) चौथ्या आणि ज्युलियन वेबर ( १२९१) पाचव्या क्रमांकावर आहे.
 

Web Title: Madhur Bhandarkar asks gold-medalist Neeraj Chopra about his interest in acting, he reply...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.