शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडचे पारडे जड पण कार्डीफचे मैदान पाकिस्तानसाठी लकी

By admin | Updated: June 14, 2017 12:55 IST

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये उपांत्यफेरीचा पहिला सामना होणार आहे.

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. 14 - चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये उपांत्यफेरीचा पहिला सामना होणार आहे. पाकिस्तानच्या तुलनेत इंग्लंडचा संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडयांवर सरस असल्याने विजयासाठी इंग्लंडला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. कारण साखळी गटातही इंग्लंडने आपले तिन्ही सामने सहज जिंकले आहेत. 
 
याउलट पाकिस्तानला उपांत्यफेरी गाठताना साखळी गटात संघर्ष करावा लागला आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता. इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या वनडे सामन्यांची आतापर्यंतची आकडेवारीही इंग्लंडला अनुकूल आहे. पण ज्या कार्डीफच्या मैदानावर सामना होणार आहे त्या मैदानात पाकिस्तानने इंग्लंडवर विजय मिळवला आहे. 
 
दोन्ही संघांमध्ये झालेल्या वनडे लढतीत इंग्लंडने 49 तर, पाकिस्तानने 30 विजय मिळवले आहेत. इंग्लंडमध्ये इंग्लंडने 26 तर, पाकिस्तानने 14 विजय मिळवलेत. तीनवेळा विश्वकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या इंग्लंडला गेल्या ४२ वर्षांत ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये जेतेपद पटकावता आलेले नाही. इयोन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील संघ समतोल भासत असून, या वेळी जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. 
 
आणखी वाचा 
 
ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या यजमानपदाखाली २०१५ मध्ये आयोजित विश्वकप स्पर्धेत पहिल्या फेरीत गाशा गुंडाळणाऱ्या इंग्लंड संघाने त्यानंतर कामगिरीत चांगली सुधारणा केली. गेल्या वर्षी त्यांनी मायदेशात खेळताना पाकिस्तानचा वन-डे सामन्यांच्या मालिकेत ४-१ ने पराभव केला, त्यात ट्रेंटब्रिजमध्ये फटकावलेल्या विश्वविक्रमी ४४४ धावसंख्येचा समावेश होता.
 
पाक आव्हान देणार का?
आतापर्यंत इंग्लंड स्पर्धेतील सर्वोत्तम संघ आहे. त्यांनी एकही लढत गमावलेली नाही. दुसऱ्या बाजूचा विचार करता पाकिस्तानने कर्णधार सरफराज अहमदच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेचा तीन गडी राखून पराभव केला.
या विजयामुळे पाक संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. सोमवारी झालेल्या पराभवासाठी श्रीलंका संघ स्वत:च जबाबदार आहे. श्रीलंका संघाचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे होते.
सलामीवीर फखर जमानने श्रीलंकेविरुद्ध ३६ चेंडूंना सामोरे जाताना ५० धावांची खेळी केली. पण मधल्या फळीतील फलंदाजांची कामगिरी चिंतेचा विषय आहे. गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर, जुनेद खान, हसन अली व फहीम खान यांनी छाप सोडली आहे.
 
हे ठरतील ‘मॅच विनर’
बेन स्टोक्सच्या रूपाने इंग्लंडकडे जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. तो फलंदाजी व गोलंदाजीमध्ये कुठल्याही संघाविरुद्ध वर्चस्व गाजवण्यास सक्षम आहे.
त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये २० लाख डॉलरची विक्रमी किंमत मिळाली होती. जो रुटही विश्वदर्जाचा फलंदाज असून तो फॉर्मातही आहे. मधल्या फळीतील मोर्गन व जोस बटलर आहेत, तर सलामीला एलेक्स हेल्स व जेसन रे संघाला चांगली सुरुवात करून देत आहेत.
वेगवान गोलंदाजांमध्ये जॅक बॉल व लियाम प्लंकेट यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे, तर मार्क वूडने स्ट्राईक बॉलर म्हणून कर्णधार मॉर्गनचा विश्वास सार्थ ठरविला आहे. टाचेवर तीनदा शस्त्रक्रिया झाल्यानंतर वूड संघात परतला आहे. त्याचा वेग तसूभरही कमी झालेला नाही.
 
उभय संघ यातून निवडणार
 
इंग्लंड : इयॉन मोर्गन(कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, जॅक बॉल, सॅम बिलिंग्स, अ‍ॅलेक्स हेल्स, जोश बटलर, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रुट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, स्टीव्हन फिन.
 
पाकिस्तान : सर्फराज अहमद(कर्णधार), अहमद शहजाद, अजहर अली, बाबर आजम, फहीम अशरफ, फखर जमान, हारिस सोहेल, हसन अली, इमाद वसीम, जुनैद खान, मोहम्मद आमिर , मोहम्मद हफीज, शादाब खान,शोएब मलिक.