निष्ठा, युगा, आर्या, सिद्धीला सुवर्ण
By Admin | Updated: June 16, 2015 01:55 IST2015-06-16T01:55:36+5:302015-06-16T01:55:36+5:30
निष्ठा आगरवाल, युगा बिरनाळे, आर्या राजगुरू, सिध्दी कारखानीस यांनी आपआपल्या गटात सुवर्णपदक जिंकून राज्य जलतरण अजिंक्यपद स्पर्धेचा शेवटचा दिवस गाजविला.

निष्ठा, युगा, आर्या, सिद्धीला सुवर्ण
पुणे : निष्ठा आगरवाल, युगा बिरनाळे, आर्या राजगुरू, सिध्दी कारखानीस यांनी आपआपल्या गटात सुवर्णपदक जिंकून राज्य जलतरण अजिंक्यपद स्पर्धेचा शेवटचा दिवस गाजविला.
पुणे जिल्हा जलतरण संघटनेच्यावतीने म्हळुंगे-बालेवाडी येथिल शिवछत्रपती क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर पार पडलेल्या या स्पर्धेत रविवारी पुणेच्या निष्ठा आगरवालने १२ वर्षाखालील मुलींच्या गटात १०० मी. बॅक स्ट्रोक प्रकारात १.१९.३३ सेकंदाची वेळ नोदंवून सुवर्णपदक जिंकले. या प्रकारात पुण्याच्या रिया टावरीला कास्यपदकावर समाधान मानावे लागले.
१७ वर्षाखालील मुलींच्या गटात युगा बिरनाळेने २०० मी. बॅक स्ट्रोममध्ये २.३३.८७ अशी वेळ नोंदवून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्तापित केला. याच वयोगटात ५० मी. बटरफ्लाय प्रकरात ३०.४४ वेळेची नोंद करुन आर्या राजगुरुने सुवर्णपदक आपल्या नावावर केले. युगे बिरनाळेला रौप्य तर आकांक्षा बुचडेला कास्यपदकावर समाधान मानावे लागले. १४ वर्षाखालील मुलींच्या गटात सिध्दी कारखानीसने ५० मी. बटरफ्लाय प्रकारात ३२.११ वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले.
महत्त्वाचे निकाल :
१०० मी. फ्री स्टाईल
मुले : इशान मोहरा (मुंबई, ५४.५६ नवीन स्पर्धा विक्रम), विराज प्रभू (ठाणे, ५५.५१), मिहिर आंब्रे (पुणे, ५७.२०), मुली : मोनिक गांधी (मुंबई, १.००), आकांक्षा बुचडे (पुणे १.०३.८७), मल्लिका बेकेरीकर (मुंंबई, १.००३.९०)
२०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक
मुले : सिद्धार्थ संख्ये (मुंबई, २.३८.८२), मुफद्दल कापसी (मुंबई, २.५१.११), आकाश वाटकर (पुणे, २.५३.९१), मुली : आरती पाटील (मुंबई २.५१.०१ नवीन स्पर्धा उपक्रम), ज्योती पाटील (मुंबई, २.५४.२८), सागरिका जैन (ठाणे २.५६.११);
४०० मी. वैयक्तिक मिडले
मुले : जेसन स्मिथ (मुंबई, ४.५६.८२), प्रज्वल वाहा (कोल्हापूर, ५.०३.६२), संदेश मालवणकर (कोल्हापूर, ५.२२.१०)