शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सुशील कुमारविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 6:06 AM

दिल्ली पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी छापेमारीदेखील केली होती. सुशील सतत आपले स्थान बदलत असून, हत्येनंतर तो हरिद्वार आणि ऋषीकेशला गेल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली : राजधानीच्या उत्तरेकडील छत्रसाल स्टेडियमबाहेर झालेल्या मारहाण आणि हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पिकची दोन पदके जिंकणारा मल्ल सुशील कुमार याच्याविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस बजावली आहे.५ मे रोजी २३ वर्षांचा युवा मल्ल सागर राणा याने जबर मारहाणीनंतर इस्पितळात प्राण गमावले होते. याशिवाय सागरचे चार मित्र गंभीर जखमी झाले. यात सुशीलसह अनेक जण आरोपी आहेत. दिल्ली पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी छापेमारीदेखील केली होती. सुशील सतत आपले स्थान बदलत असून, हत्येनंतर तो हरिद्वार आणि ऋषीकेशला गेल्याची माहिती आहे. तो एका आश्रमात थांबल्याची माहिती मिळताच तेथील पोलिसांनीदेखील छापा घातला होता. मात्र, तो अद्याप पोलिसांपासून दूर आहे.स्टेडियमशेजारच्या माॅडर्न कॉलनीत स्वत:चा फ्लॅट सुशीलने सागरला भाड्याने दिला होता. फ्लॅट रिकामा करण्यावरून वाद विकोपाला गेल्यामुळे सुशीलने काही जणांना हाताशी धरुन सागरचा काटा काढल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.यासंदर्भात सुशीलचे सासरे महाबली सतपाल यांच्यासह अनेकांकडे विचारपूस करण्यात आली आहे. हत्याकांडात सुशीलचा हात असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे असून, आरोपपत्रात त्याचे नाव आहे. तो सतत गुंगारा देत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. सुशीलने २००८ च्या बीजिंग आणि २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पदके जिंकली होती. त्याला ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमारWrestlingकुस्तीIndiaभारत