शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

LIVE : रिओ कुस्ती - विनेश फोगटचे आव्हान संपुष्टात तर साक्षी मलिक विजयी

By admin | Updated: August 17, 2016 20:47 IST

दुसऱ्या उपउपांत्यपुर्व सामन्यात साक्षी मलिकने विजय संपादन करत उपांत्यपुर्व सामन्यात प्रवेश केला. ५८ किलो वजनी गटातील सामन्यात साक्षी मलिकने मोल्दोव्हाच्या मेरियानाचा पराभव केला.

ऑनलाइन लोकमतरिओ, दि. १७ : उपांत्यपुर्व फेरीतील सामन्यादरम्यान जखमी झाल्यामुळे विनेश फोगटला पराभवला सामोर जाव लागलं, सामन्यादरम्यान चीनच्या सॅन येनानाशी दोन हात करताना तिला जखम झाली. सामन्याच्या सुरवातीपासूनच सॅन अक्रमक होती पण फोगटने तिला जश्याच तशे प्रतिउत्तर दिलं मात्र, जखमी असल्यामुळे विनेशने चीनच्या सुन यानानविरुद्ध लढतीतून माघार घेतली. ४८ किलो वजनी गटाच्या लढतीदरम्यान विनेशचा उजवा गुडघा दुखावला झाली आणि  खेळणे कठिण जात असल्यामुळे सॅनला विजयी घोषित केले. त्यामुळे विनेशचे स्पर्धेतील आव्हान संपुुष्टात आले आहे. 

 

दुसऱ्या उपउपांत्यपुर्व सामन्यात साक्षी मलिकने विजय संपादन करत उपांत्यपुर्व सामन्यात प्रवेश केला. ५८ किलो वजनी गटातील सामन्यात साक्षी मलिकने मोल्दोव्हाच्या मेरियानाचा पराभव केला. साक्षी मलिकने ५-५ अशा फरकाने सामन्यात विजय मिळवला. सामन्यात समान गुण झाल्यानंतर साक्षी मलिकला बचावत्मक आणि आक्रमक पवित्र्यामुळे पंचानी विजयी घोषित केले. 

रिओ ऑलिम्पिकमधील महिला कुस्तीमध्ये भारताच्या विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी विजय मिळवला आहे.  महिलांच्या ४८ किलो वजनी गटात विनेश फोगटने या विजयासह उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला आहे. विनेश फोगटने रोमानियाच्या एमिलिया एलिना ११-० असा दारुन पराभव केला आहे. तर ५८ किलो वजनी गटात साक्षी मलिकने ५-४ अशा फरकाने विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

साक्षीने स्वीडन जोहाना मॅटसोनचा पराभव करत आपला विजय संपादन केला. विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांच्या कामगीरीमुळेभारताला त्यांच्याकडून पदकाची आशा आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत साक्षी मलिक मोल्दोव्हाच्या मेरियाना सोबत लढणार आहे. तर उपांत्यपूर्वसामन्यात विनेश फोगट चीनच्या सॅन येनानाशी दोन हात करणार आहे. विनेश फोगटने चीनच्या खेळाडूचा पराभव केल्यास तीचा अंतिम ४ खेळाडूमध्ये सहभाग होईल. विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांच्या सामन्यास थोड्याच वेळात होणार सुरवात होणार आहे.

- रिओ ऑलिम्पिक - महिला कुस्तीमधील ५८ किलो वजनी गटातील साक्षी मलिकचा उपउपांत्यपूर्व फेरीतील सामन्यास सुरुवात

- महिला कुस्तीमधील ५८ किलो वजनी गटातील सामन्यात साक्षी मलिकचा विजय. मोल्दोव्हाच्या मेरियानाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीतील फेरीत केली प्रवेश- मोल्दोव्हाच्या मेरियाना ५-५ अशा फरकाने केला पराभव.

- रिओ ऑलिम्पिक - महिला कुस्ती - ४८ किलो वजनी गटातील विनेश फोगटच्या सामन्यास सुरवात

- रिओ ऑलिम्पिक - महिला कुस्ती - सामन्यादरम्यान विनेश फोगट जखमी

 - रिओ ऑलिम्पिक - महिला कुस्ती - सामन्यादरम्यान जखमी झाल्यामुळे विनेश फोगटचा पराभव

-  महिला कुस्ती - चीनच्या सॅन येनानाचा विजय, जखमी विनेश फोगटचे आव्हान संपुष्टात