शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

मेलबोर्नमध्ये अखेरची संधी

By admin | Updated: December 23, 2014 02:08 IST

आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी सामना गमावल्यानंतर मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर भारतीय संघ तिस-या कसोटी सामन्यात सरशी

मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी सामना गमावल्यानंतर मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात सरशी साधत आॅस्ट्रेलियाविरुद्ध सलग सातवा पराभव टाळण्यासाठी व मालिका बरोबरीत सोडविण्याची आशा कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. २००८ मध्ये भारताने अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली आॅस्ट्रेलियाचा पर्थ कसोटी सामन्यात पराभव करीत मालिकेत २-० ने विजय मिळविला होता. त्यानंतर उभय संघांना भारत व आॅस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी मालिका जिंकता आली नाही. भारताला २०११-१२ मध्ये खेळल्या गेलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४-० ने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर या मालिकेतही सलग दोन सामने गमावणाऱ्या भारतीय संघावर सलग सातव्यांदा पराभव स्वीकारण्याचे संकट घोंघावत आहे. मेलबोर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियन संघ संतुलित भासत नाही. अंगठ्याच्या दुखापतीमुळे सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. शेन वॉटसन व ब्रॅड हॅडिन यांना या मालिकेत अद्याप सूर गवसलेला नाही. दुसऱ्या कसोटीत दुखापतग्रस्त झालेल्या मिशेल मार्शच्या स्थानी युवा खेळाडू जो बर्न्सचा समावेश करण्यात आलेला आहे. कर्णधार स्टिव्ह स्मिथ व मिशेल जॉन्सन यांचा फॉर्म संघासाठी दिलासा देणारी बाब आहे, तर वेगवान गोलंदाज रेयॉन हॅरिस दुखापतीतून सावरलेला आहे. जॉन्सन व हेजलवूड यांची साथ देण्या तो सज्ज आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता भारतीय संघ समतोल भासत आहे. भारतीय गोलंदाज फॉर्मात असून, दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजांचे अपयश संघासाठी चिंतेचा विषय आहे. (वृत्तसंस्था)