मुरलीच्या उर्मटपणाची लंकेने केली तक्रार!
By Admin | Updated: July 25, 2016 20:00 IST2016-07-25T20:00:51+5:302016-07-25T20:00:51+5:30
श्रीलंका क्रिकेटचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन सध्या आॅस्ट्रेलिया संघाच्या फिरकी सल्लागाराच्या भूमिकेत आहे

मुरलीच्या उर्मटपणाची लंकेने केली तक्रार!
ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. २५ : श्रीलंका क्रिकेटचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन सध्या आॅस्ट्रेलिया संघाच्या फिरकी सल्लागाराच्या भूमिकेत आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेआधीच मुरली आपल्याच देशात वादाच्या भोवऱ्यात अडकला. लंका बोर्डाने त्याच्या उर्मटपणाची तक्रार आॅस्ट्रेलियाच्या व्यवस्थापनाकडे केली.
लंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तिलंगा सुमतीपाला यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की,ह्यमुरलीकडून अशा उद्दामपणाची अपेक्षा नव्हती. मुरली बेछूटपणे पाल्लेकल स्टेडियममध्ये शिरला आणि लंका संघाचे व्यवस्थापक चरिता सेनानायके यांच्याशी हुज्जत घातली.ह्ण स्टेडियमच्या अधिकाऱ्यांनी पाहुण्या संघाला क्षेत्ररक्षणाची संधी नाकारल्यामुळे मुरली लालबुंद झाला
होता. तो आॅस्ट्रेलिया संघासोबत आऊटफिल्डमध्ये आला. त्याआधी मुरलीने सरावासाठी खेळपट्टी तयार करताना क्यूरेटर तसेच कर्मचाऱ्यांवर दडपण आणल्याचा आरोप एसएलसीने केला आहे.
....................................