17 वर्षीय कोमालिकाचा 'सुवर्ण'वेध; जागतिक तिरंदाजीत जेतेपद पटकावणारी तिसरी भारतीय 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 05:43 PM2019-08-25T17:43:55+5:302019-08-25T17:44:27+5:30

भारताच्या 17 वर्षीय कोमालिका बारीनं जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानच्या वाका सोनोडाला नमवून कॅडेट महिला गटाचे सुवर्णपदक नावावर केले.

KOMALIKA BARI BECOMES THIRD INDIAN ARCHER TO HOLD WORLD ARCHERY CHAMPION CROWN | 17 वर्षीय कोमालिकाचा 'सुवर्ण'वेध; जागतिक तिरंदाजीत जेतेपद पटकावणारी तिसरी भारतीय 

17 वर्षीय कोमालिकाचा 'सुवर्ण'वेध; जागतिक तिरंदाजीत जेतेपद पटकावणारी तिसरी भारतीय 

Next

माद्रिद : भारताच्या 17 वर्षीय कोमालिका बारीनं जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानच्या वाका सोनोडाला नमवून कॅडेट महिला गटाचे सुवर्णपदक नावावर केले. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती तिसरी भारतीय तिरंदाज ठरली आहे. ''जागतिक जेतेपद जिंकल्याचा आनंद आहे. हे यश माझ्या प्रशिक्षकांमुळे शक्य झाले आहे,'' अशी प्रतिक्रिया कोमालिकाने दिली. 

झारखंडची कोमालिका ही जागतिक स्पर्धेत 18 वर्षांखालील महिला गटाचे जेतेपद पटकावणारी दुसरी भारतीय आहे. याआधी 2009मध्ये दिपिका कुमारीने याच गटात बाजी मारली होती आणि त्यानंतर तिने 2011मध्ये कनिष्ठ ( 21 वर्षांखालील) गटाचे जेतेपद नावावर केले होते. 2006मध्ये पल्टन हँस्डाने 2006च्या जागतिक स्पर्धेत कनिष्ठ पुरुष गटातील कम्पाऊंड प्रकारात बाजी मारली होती.


कोमालिकाने 4-0 अशी आघाडी घेत प्रतिस्पर्धीवर दडपण निर्माण करण्यात यश मिळवले होते. सोनोडाने तिसऱ्या सेटमध्ये मुसंडी मारताना गुणांचे अंतर तीन अंकांनी कमी केले. चौथ्या सेटमध्ये कोमालिकाने कमबॅक करताना 5-3 असा विजय मिळवला. ''मी पिछाडीवर पडत होते. पण, मी चूकांतून शिकले आणि कमबॅक केले. तणाव घालवण्यासाठी मी दीर्घ श्वास घेतला. हे जेतेपद तुझेच आहे, असे मी स्वतःला सांगत होते,''असे कोमालिकाने सांगितले.  


 

Web Title: KOMALIKA BARI BECOMES THIRD INDIAN ARCHER TO HOLD WORLD ARCHERY CHAMPION CROWN

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.