शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, मुंबई विभागाची बाजी राज्यस्तरीय शालेय कबड्डी क्रीडा पानासाठी...

By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST

फोटो ०४एसएनएसपीओ१ - राज्यस्तरीय शालेय कबड्डीतील विजेत्यांचा गौरव करताना क्रीडा व युवक संचालनालयाच्या सहायक संचालिका सुवर्णाताई बारटक्के, एन. बी. मोटे, ॲड. चिमण डांगे, पंकज शिरसाट, युवराज नाईक, भगवान बोते.

फोटो ०४एसएनएसपीओ१ - राज्यस्तरीय शालेय कबड्डीतील विजेत्यांचा गौरव करताना क्रीडा व युवक संचालनालयाच्या सहायक संचालिका सुवर्णाताई बारटक्के, एन. बी. मोटे, ॲड. चिमण डांगे, पंकज शिरसाट, युवराज नाईक, भगवान बोते.
आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात आयोजित राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात कोल्हापूरने, १७ वर्षाखालील मुलांच्या गटात औरंगाबादने, तर मुलींच्या गटात मुंबई विभागाने तसेच १४ वर्षाखालील मुलात नागपूर, तर मुलींमध्ये नागपूरने बाजी मारली.
विजेत्या खेळाडूंना क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या सहायक संचालिका सुवर्णाताई बारटक्के यांच्याहस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपसंचालक एन. बी. मोटे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त पंकज शिरसाट, प्रो-कबड्डी दिल्ली दबंग संघाचा खेळाडू काशिलिंग आडके, संजय पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, माजी प्राचार्य विश्वास सायनाकर, एस. टी. माने, प्रा. भगवान बोते, दादासाहेब आवाड, संस्थेचे सचिव ॲड. चिमण डांगे, प्रा. आर. ए. कनाई, व्यवस्थापक सुनील शिणगारे, दीपक अडसूळ, किसनराव गावडे उपस्थित होते. प्रदीप वेंगुर्लेकर यांनी प्रास्ताविक केले.
१९ वर्षाखालील मुलांमध्ये कोल्हापूरने औरंगाबादवर, तर लातूरने नाशिकवर विजय मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. १९ वर्षाखालील मुलींमध्ये कोल्हापूरने पुणे विभागावर एकतर्फी विजय मिळविला, तर मुंबईने अमरावतीवर विजय मिळवित तृतीय क्रमांक पटकावला.
१७ वर्षाखालील मुलांमध्ये औरंगाबादने अमरावतीवर मात करीत प्रथम क्रमांक पटकावला. पुणे विभागाने लातूरवर एका गुणाची आघाडी घेत तिसरा क्रमांक पटकावला. १७ वर्षाखालील मुलींमध्ये मुंबईने लातूरवर विजय मिळविला, तर पुणे विभागाने नाशिकवरआघाडी घेत तृतीय क्रमांक पटकावला.
१४ वर्षाखालील मुलांच्या गटात नागपूरने लातूरवर, तर कोल्हापूरने रोमहर्षक सामन्यात औरंगाबादवर २ गुणांनी विजय मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. १४ वर्षाखालीली मुलींच्या गटात पुणे विभागाने कोल्हापूरवर एकतर्फी विजय मिळविला. औरंगाबादने नागपूरवर मात करीत तृतीय क्रमांक पटकाविला.
कोल्हापूर विभागात १९ वर्षे वयोगटातील कृष्णा मदने, रवींद्र कुमावत, सतपाल कुमावत, कन्हैया बोडरे, प्रदीप माने, अनिकेत बोडरे, रोहन तेवटे, क्रांती पाटील यांनी चमकदार खेळ केला. १७ वर्षाखालील मुलींमध्ये पूजा पाटील, गौरी पाटील, रेश्मा मोरे, पल्लवी जाधव, ऋजुता जाधव, योगीता पाटील या मुलींनी उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकडी घेऊन क्रीडा रसिकांची मने जिंकली. विजेत्यांचा प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. प्राचार्य सुभाष पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)