शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

केकेआर सातत्य टिकविणार?

By admin | Updated: May 2, 2015 00:02 IST

चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या विजयामुळे उत्साहित कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल-८ मध्ये शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुला नमवित विजयी सातत्य टिकविण्याचे आव्हान असेल.

बेंगळुरू : चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या विजयामुळे उत्साहित कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल-८ मध्ये शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुला नमवित विजयी सातत्य टिकविण्याचे आव्हान असेल. कालच्या विजयासह केकेआर गुण तालिकेत चार विजय आणि दोन पराभवांसह तिसऱ्या स्थानावर आला. एक सामना पावसात वाहून गेला. दुसरीकडे आरसीबी सात सामन्यात तीन विजयांसह चौथ्या स्थानावर आहे. सीएसकेविरुद्धचा विजय केकेआरसाठी उत्साह वाढविणारा ठरला. या उत्साहार आरसीबीला नमविण्याचे त्यांना कसब करावे लागेल. कर्णधार विराट कोहली आणि ख्रिस गेल यांच्या अपयशानंतरही आरसीबीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध २०० धावा उभारल्या होत्या. रॉबिन उथप्पाला सूर गवसणे केकेआरसाठी शुभसंकेत आहेत. त्याने चेन्नईविरुद्ध नाबाद ८० आणि आंद्रे रसेल याने नाबाद ५५ धावा ठोकल्या होत्या. पण कर्णधार गंभीर आणि युसूफ पठाणसह अनेक फलंदाज अपयशी ठरले हा केकेआरसाठी चिंतेचा विषय आहे. गोलंदाजीत मात्र ब्रॅड हॉग हुकमी एक्का ठरला. त्याने काल चार बळी घेतले.आरसीबीची सुरुवात चांगली झाली नव्हती पण राजस्थान रॉयल्सला अहमदाबादमध्ये आणि डेअरडेव्हिल्सला कोटलावर नमवित पुनरागमन केले. पण घरच्या मैदानावरील अपयशाने चिंता वाढली. गेल, कोहली आणि डिव्हिलियर्सच्या उपस्थितीत फलंदाजी भक्कम आहे पण गोलंदाजी कमकुवत वाटते. आॅस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कच्या नेतृत्वात आरसीबीच्या माऱ्याने दिल्लीला ९५ धावांत लोळविले होते. स्टार्कला वरुण अ‍ॅरोन आणि डेव्हिड वीज यांची साथ लाभली असून फिरकीची जबाबदारी यजुवेंद्र चहल याच्यावर असेल. (वृत्तसंस्था)