शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

किंग्ज इलेव्हन पंजाबचा गुजरात लायन्सवर 23 धावांनी दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2016 21:55 IST

इंडियन प्रीमिअर लीगच्या म्हणजेच आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात लायन्स संघाला किंग्ज इलेव्हन पंजाबनं पराभवाची धूळ चारली आहे.

 ऑनलाइन लोकमत

राजकोट, दि. 1- इंडियन प्रीमिअर लीगच्या म्हणजेच आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात लायन्स संघाला किंग्ज इलेव्हन पंजाबनं पराभवाची धूळ चारली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघानं दिलेल्या 155 धावांचा पाठलाग करताना गुजरात लायन्सला घाम फुटला आहे. गुजरात लायन्सनं 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 131 धावा कुटल्यात. किंग्ज इलेव्हन पंजाबनं विजयरथावर असलेल्या गुजरात लायन्सला विजयापासून रोखले आहे.

स्मिथनं 18 चेंडूंत 1 चौकार आणि 1 षटकारासह 15 रन्स काढून धडाकेबाज सुरुवात करूनही गुजरात लायन्सच्या पदरी अपयश आलं आहे. कॅप्टन रैनानंही 15 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकार खेचत 18 धावा केल्या आहेत. मात्र विजयापासून रैनाच्या संघाला दूर राहावे लागले आहे. यावेळी किशननं 24 चेंडूंत 3 चौकार मारत 27 धावा खेचल्यात. तर फॉकनरनं 27 चेंडूंत 3 चौकार झोडत 32 धावा केल्यात. कुमारनंही 13 चेंडूंत 2 चौकार लगावत 15 धावा केल्या आहेत. मॅक्युलम 1, कार्तिक 2, जडेजा 11, कुलकर्णी नाबाद 6. तर ब्राव्हो भोपळाही न फोडता परतला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघानं गुजरात लायन्ससमोर 155 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. 
राजकोटवरच्या या सामन्यात सर्वच्या सर्व गडी गमावून किंग्ज इलेव्हन पंजाबनं 19.5 षटकांत 154 धावा केल्या आहेत. एम. विजयनं 41 चेंडूंमध्ये 6 चौकार लगावत 55 धावा काढून विजयी घोडदौडीला सुरुवात करूनही पदरी अपयश आलं आहे. एम.पी. स्टॉनिसनंही शानदार खेळी खेळत 17 चेंडूंमध्ये 1 षटकार आणि 3 चौकार ओढत 27 धावा केल्या आहेत. मिलरनं 27 चेंडूंमध्ये 2 चौकार ओढत 31 धावा कुटल्यात. तर साहानं 19 चेंडूंमध्ये 4 चौकार लगावत 33 धावा काढल्या आहेत. शर्मा 1, करिप्पा 1, संदीप शर्मा नाबाद 1 धावा काढल्या.  मॅक्सवेल आणि पटेल भोपळाही न फोडता माघारी परतले. तर मार्शनं 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धावा काढून बाद झाला. गुरुकीरत सिंगही धावबाद झाला. या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबनं विजय मिळवून आपले स्थान अधोरेखित केलं आहे. तर गुजरात लायन्सवर पराभव पत्करण्याची नामुष्की ओढावली आहे.