शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘चेपॉक’वर चेन्नईच किंग

By admin | Updated: April 29, 2015 01:33 IST

धोनीच्या धुरंधरांनी धमाल करत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या रोमांचक सामन्यात अवघ्या दोन धावांनी बाजी मारली.

कोलकात्याकडून हिसकावला सामना : २ धावांनी निसटता विजयचेन्नई : धोनीच्या धुरंधरांनी धमाल करत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या रोमांचक सामन्यात अवघ्या दोन धावांनी बाजी मारली. १३५ धावांचे सोपे वाटणारे आव्हान कोलकात्यासाठी ‘चॅलेंजिंग’ ठरले. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात केकेआरने ९ बाद १३२ धावा अशी मजल मारली. शिस्तबद्ध गोलंदाजी व धोनीची ‘कॅप्टन्सी’ यामुळे चेपॉक मैदानावर पुन्हा एकदा चेन्नईच ‘किंग’ ठरला. ब्राव्होने सर्वाधिक ३ बळी घेतले. १३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार गौतम गंभीर पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर परतला. त्यानंतर मनीष पांडे आणि रॉबिन उथप्पा या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. उथप्पाने १७ चेंडूत ३९ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. मनीष पांडेने १५ धावा केल्या. पांडे बाद झाला त्या वेळी कोलकाता संघ ३ बाद ६१ अशा स्थितीत होता. कोलकाता हे लक्ष्य सहज गाठेल असे दिसत होते. मात्र, सूर्यकुमार यादव (१६), यूसफ पठाण (१३) हे टप्प्याटप्प्याने बाद झाले.त्यानंतर ब्राव्होने कोलकात्याची चांगलीच गोची केली. त्याने कमिन्स (०) आणि पियूष चावला (०) यांना एकाच षटकात तंबूत पाठवले. एका बाजूने रेयान डोएशे फटकेबाजी करीत होता. तर दुसऱ्या बाजूने धोनीचे गोलंदाज फलंदाजांना तंबूत पाठवत होते. त्यामुळे कोलकात्याची स्थिती ‘गंभीर’ झाली. डोएशने (३८) अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला. मात्र, त्याला अपयश आले. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक ३, आश्विनने २ तर पांडे, नेहरा आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्याआधी, कोलकाताने चेन्नईला ६ बाद १३४ धावांवर रोखले. चेन्नईकडून ड्यु प्लेसिसने सर्वाधिक २९ धावांची खेळी केली. कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. गौतमचा हा निर्णय ‘गंभीर’च होता हे गोलंदाजांनी अखेर सिद्ध केले. पहिल्या गड्यासाठी ४२ धावांची भागीदारी करीत चेन्नईच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र, पियूषच्या फिरकीने ब्रॅँडन मॅक्युलमला चकवले. ब्रॅँडनने १४ चेंडूंत १९ धावा केल्या. यामध्ये ३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्यानंतर यूसफ पठाणच्या ‘सुपर’ थ्रोने ड्वेन स्मिथ धक्कादायकरीत्या धावबाद झाला. स्मिथने आपल्या खेळीत ३ चौकार आणि एक षटकार ठोकला. यानंतर सुरेश रैना आणि प्लेसिसने प्रयत्न केले. मात्र, रैना १७ धावांसाठी २१ चेंडू खेळला. अखेर रसेलच्या चेंडूवर रैना बाद झाल्यावर चेन्नई ९.३ षटकांत ३ बाद ६७ अशा स्थितित होता. धोनी (३) पाठोपाठ ब्राव्हो (५), रवींद्र जडेजा (१५) हे स्वस्तात परतले. त्यामुळे चेन्नई १९ व्या षटकांत ६ बाद १२४ अशा स्थितीत सापडली. एका बाजून ड्यु प्लेसिसने २९ चेंडूंत २९ धावा काढल्याने चेन्नईला समाधानकारक धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. (वृत्तसंस्था)गोलंदाजी : कमीन्स ४-०-२५-०; यादव ४-०-३६-०; चावला ४-०-२६-२; हॉग ४-०-१८-१; रसेल ४-०-२६-२. कोलकाता: उथप्पा झे. मॅक्क्युलम गो. अश्विन ३९, गंभीर झे. धोनी गो. पांड्ये ०, मनिष झे. ब्रावो गो. अश्विन १५, यादव झे. ब्रावो. गो. शर्मा १६, पठाण त्रि. गो. ब्रावो १३, डोइशेट नाबाद ३८, रसेल धावबाद (जडेजा/धोनी) ४, कमीन्स झे. जडेजा गो. ब्रावो ०, चावला झे. धोनी गो. ब्रावो ०, यादव त्रि. गो. नेहरा ०, हॉग नाबाद २. अवांतर - ५. एकूण: २० षटकांत ९ बाद १३२ धावा.गोलंदाजी : पांड्ये २-०-१८-१; नेहरा ४-०-३८-१; शर्मा ३-०-२४-१; अश्विन २-०-५-२; जडेजा ३-०-११-०; रैना ३-०-१२-०; ब्रावो ३-०-२२-३.चेन्नई : स्मिथ धावबाद (पठाण) २५, मॅक्क्युलम पायचीत गो. चावला १९, रैना झे. उथप्पा गो. रसेल १७, प्लेसिस नाबाद २९, धोनी झे. उथप्पा गो. रसेल ३, ब्रावो झे. सुर्यकुमार गो. चावला ५, जडेजा त्रि. गो. हॉग १५, अश्विन नाबाद ९. अवांतर - १२. एकूण: २० षटकांत ६ बाद १३४ धावा