शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

किरेनची ऐतिहासिक कामगिरी

By admin | Updated: October 4, 2016 03:21 IST

नागपूरमध्ये जन्मलेल्या किरेन डिसूझाने १ आॅक्टोबला ऐतिहासिक कामगिरी करताना जगातील खडतर मानल्या जाणाऱ्या २४६ किलोमीटर अंतराची

नागपूर : नागपूरमध्ये जन्मलेल्या किरेन डिसूझाने १ आॅक्टोबला ऐतिहासिक कामगिरी करताना जगातील खडतर मानल्या जाणाऱ्या २४६ किलोमीटर अंतराची ‘स्पार्टाथॅलोन’ यशस्वीपणे पूर्ण केली. या वार्षिक स्पर्धेचे आयोजन ग्रीसच्या अथेन्स आणि स्पार्ट यांच्यादरम्यान करण्यात आले होते. अशी कामगिरी करणारा २३ वर्षीय किरेन भारताचा पहिला स्पर्धक ठरला. त्याने हे अंतर ३३ तास ३ मिनिट २५ सेकंद वेळेत पूर्ण केले. या शर्यतीदरम्यान त्याने १०० मैल अंतर १८.३७ तासांमध्ये पूर्ण करण्याचा पराक्रम करताना १५९.५ किलोमीटर अंतरावर असलेला ४७वा चेक पॉर्इंट गाठला. सहभागी ३७० स्पर्धकांमध्ये त्याला ८६व्या स्थानावर समाधान मानावे लागले. शर्यत पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांसाठी पुरस्कार नव्हता. शर्यत पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाचा ओलिव्हच्या पानाचा मुकुट देऊन गौरव करण्यात आला आणि पुरस्कार म्हणून इरोटस नदीचे जल प्रदान करण्यात आले. २०१२पासून किरेन या शर्यतीसाठी तयारी करीत होता. या शर्यतीसाठी पात्र ठरलेला तो पहिला भारतीय ठरला. या शर्यतीपूर्वी त्याला ६० किलोमीटर अंतराच्या शर्यतीचा ‘अल्ट्रा मॅराथॉनपटू’ म्हणून गौरविण्यात आले होते. गेल्या वर्षी त्याने १०० मैलांची सालोमन भट्टी लेक्स अल्ट्रा मॅरेथॉन जिंकून सर्वांत वेगवान भारतीय अ‍ॅथलिटचा मान मिळवला होता. गेल्या वर्षी त्याने लद्दाखची २२२ किलोमीटर अंतराची अल्ट्रा शर्यत पूर्ण करणारा पहिला भारतीय अ‍ॅथलिट होण्याचा मान मिळवला होता. शर्यत पूर्ण केल्यानंतर मीडियाश्ी बोलताना किरेन म्हणाला, ‘‘अनेक प्रायोजक व समर्थकांच्या पाठिंब्यामुळे मला ही अनोखी शर्यत पूर्ण करण्यात यश आले. भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी मला शक्तिवर्धक आहार व आर्थिक साह्याची गरज आहे.’’ (क्रीडा प्रतिनिधी)