शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

खेलो इंडिया : जलतरणात आणखी तीन सुवर्णपदकंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 10:29 PM

वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य ; टेनिसमध्ये आगेकूच

गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने जलतरणातील पदकांची लयलूट कायम राखताना तीन सुवर्ण, दोन रौप्य व एका ब्राँझपदकाची भर घातली. 

केनिशा गुप्ताने मुलींच्या १७ वर्षाखालील गटात २०० मीटर्स वैयक्तिक मिडले रिले शर्यत २ मिनिटे २५.८० सेकंदांत जिंकली. तिचीच सहकारी अपेक्षा फर्नान्डीस हिने रौप्यपदक पटकाविले. तिने हे अंतर २ मिनिटे २९.२५ सेकंदांत पार केले. याच वयोगटात केनिशा व अपेक्षा यांनी करिना शांता व पलक धामी यांच्या साथीत ४ बाय १०० मीटर्स मिडले रिले शर्यतीचेही सुवर्णपदक पटकाविले. त्यांनी हे अंतर ४ मिनिटे २९.५९ सेकंदांत पूर्ण केले. मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राला या शर्यतीत ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.मुलांच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या वेदांत बापना याने २०० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत सोनेरी कामगिरी केली. त्याने ही शर्यत २ मिनिटे १०.८५ सेकंदांत पार केली. याच वयोगटात सुश्रुत कापसे याने ८०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत रौप्यपदक पटकाविले. त्याला हे अंतर पार करण्यास ८ मिनिटे ५२.७४ सेकंद वेळ लागला.*वेटलिफ्टिंगमध्ये रितेशला रौप्यपदकमहाराष्ट्राच्या रितेश म्हैसाळ याने युवा गटाच्या ८९ किलो विभागात रौप्यपदक मिळविले. त्याने स्नॅचमध्ये ११२ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १३६ किलो असे एकूण २४८ किलो वजन उचलले. त्याचाच सहकारी सानिध्य मोरे याला याच विभागात ब्राँझपदक मिळाले. त्याने अनुक्रमे १०९ व १३४ किलो असे एकूण २४३ किलो वजन उचलले. मुलींच्या युवा ७६ किलो गटात महाराष्ट्राच्या श्रेया गणमुखी हिने रौप्यपदक मिळविले. तिने स्नॅचमध्ये ७३ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ८९ असे एकूण १६२ किलो वजन उचलले. कनिष्ठ मुलींच्या ७६ किलो गटात महाराष्ट्राच्या करुणा गढे हिला ब्राँझपदक मिळाले. तिने स्नॅचमध्ये ६४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ८६ असे एकूण १५० किलो वजन उचलले.*टेनिसमध्ये ध्रुव व आकांक्षा अंतिम फेरीतमहाराष्ट्राच्या ध्रुव सुनीश याने मुलांच्या २१ वर्षाखालील एकेरीत तर आकांक्षा नित्तुरे हिने १७ वर्षाखालील मुलींच्या एकेरीत अंतिम फेरी गाठली. ध्रुव याने उपांत्य फेरीत राजस्तानच्या फैसल कमार याचे आव्हान ६-२, ३-६, ६-३ असे संपुष्टात आणले. आकांक्षा हिने तेलंगणाच्या संजना सिरिमाला हिचा २-६, ६-२, ६-४ असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर तिने पासिंग शॉट्स व बिनतोड सर्व्हिस असा बहारदार खेळ करीत विजयश्री खेचून आणली. 

मुलींच्या २१ वर्षाखालील गटात स्नेहल माने व मिहिका यादव यांनी अंतिम फेरी गाठली. त्यांनी मुस्कान दहिया व जेनिफर लुईखा यांच्यावर ६-१, ७-६ (७-२) असा विजय मिळविला. मुलांच्या १७ वषार्खालील गटात दक्ष अगरवाल व यशराज दळवी यांनी दुहेरीत अंतिम फेरी गाठली. त्यांना योगी पन्ना व करणसिंग यांच्याकडून पुढे चाल मिळाली.

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडियाSwimmingपोहणेMaharashtraमहाराष्ट्र