खेलो इंडिया : वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या संकेत सरगरला सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 11:19 PM2020-01-17T23:19:54+5:302020-01-17T23:20:39+5:30

सरगर याचे खेलो इंडियामधील पदार्पणातच विजेतेपद आहे.

Khelo India: Maharashtra's sanket sargar gold in weightlifting | खेलो इंडिया : वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या संकेत सरगरला सुवर्ण

खेलो इंडिया : वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या संकेत सरगरला सुवर्ण

Next

आसाम, गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राच्या संकेत सरगर याने वेटलिफ्टिंगमधील कुमारांच्या ५५ किलो गटात सुवर्णपदक मिळविताना स्नॅचमध्ये १०७ किलो वजन उचलताना प्रशांत कोळी या आपल्या सहका-यानेच नोंदविलेला १०४ किलो हा  राष्ट्रीय विक्रम मोडला. 

त्याने एकूणात २३९ किलो वजन उचलीत ओडिशाच्या मुना नायक याचा २३५ किलो हा विक्रमही मोडला. सरगर याचे खेलो इंडियामधील पदार्पणातच विजेतेपद आहे. नायक (२३५ किलो) याला येथे रौप्यपदक मिळाले तर महाराष्ट्राच्या प्रशांत कोळी याने ब्राँझपदक (२३१ किलो) मिळविले.

* स्वप्न साकार झाले-संकेत
खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे माझे स्वप्न होते. ते साकार झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे असे संकेतने सांगितले. त्यांच्या वडिलांची सांगली येथे महादेव यांची पानाची टपरी आहे. सांगली येथील ज्येष्ठ खेळाडू बशीर शेख, नानासाहेब व मयूर सिंहासने यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे मी हे यश मिळवू शकलो. आता येथील सुवर्णपदकामुळे मला मिळणाºया शिष्यवृत्तीमुळे मला वेटलिफ्टिंगसाठी आवश्यक असणाºया खचार्ची तरतूद करणे शक्य होणार आहे असेही संकेतने सांगितले. तो आष्टा येथील कला व वाणिज्य महाविद्याालयात शिकत आहे. रौप्यपदक विजेता प्रशांत हा जळगाव येथे अविनाश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. गतवेळी त्याला ब्राँझपदक मिळाले होते.

Web Title: Khelo India: Maharashtra's sanket sargar gold in weightlifting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.