शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

कश्यपची माघार: सायना, श्रीकांत दुसऱ्या फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 2:13 AM

थायलंड ओपन बॅडमिंटन : साईराज-शेट्टीची दुहेरीत विजयी सलामी

बॅंकॉक : स्टार खेळाडू सायना नेहवाल आणि माजी नंबर वन किदाम्बी श्रीकांत यांनी बुधवारी थायलंड ओपन सुपर १००० बॅडमिंटन स्पर्धेत सलामीला विजय मिळवून दुसरी फेरी गाठली. कश्यपने मात्र मांसपेशींच्या दुखण्यामुळे सामन्यातून माघार घेतली.सायनाने मलेशियाची प्रतिस्पर्धी सेल्वादुरारे किसोना हिचा २१-१५, २१-१५ ने पराभव केला. श्रीकांतने आपलाच सहकारी सौरभ वर्मा याच्यावर  २१-१२, २१-११ अशा गुणफरकाने मात केली.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता कश्यप तिसऱ्या गेममध्ये ८-१४ असा पिछाडीवर होता. त्याचवेळी त्याला मांसपेशींचा त्रास सुरू झाला. कॅनडाच्या ॲन्थोनी हो शू याच्या विरोधातील पहिला गेम कश्यपने ९-२१ ने गमावला. त्यानंतरच्या गेममध्ये त्याने २१-१३ ने बाजी मारुन लढत १-१ अशी बरोबरीत आणली होती. पुरुष दुहेरीत सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने एक गेम गमाविल्यानंतरही मुसंडी मारुन कोरियाची जोडी किम जुंग  आणि ली योंग डाए यांच्यावर १९-२,२१-१६ आणि २१-१४ अशी मात करीत  सलामीचा सामना जिंकला. अर्जुन एम. रामचंद्रन आणि ध्रुव कपिला या जोडीला मलेशियाचे ओंग यू सिन आणि  टियो ई यी यांनी  १३-२१,२१-८,२४-२२ ने पराभूत केले.  मिश्र दुहेरीत सिक्की रेड्डी सुमीत रेड्डी पहिल्या सामन्यात पराभूत होऊन बाहेर पडले आहेत.

श्रीकांतच्या तक्रारीची बीडब्ल्यू एफकडून दखलकिदाम्बी श्रीकांतची वारंवार कोरोना चाचणी घेणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या वागणुकीची दखल विश्व बॅडमिंटन महासंघाने घेतली आहे. मंगळवारी झालेल्या कोरोना चाचणीनंतर श्रीकांतच्या नाकातून रक्त वाहत होते. अधिकाऱ्यांच्या वर्तनावर नाराज असलेल्या श्रीकांतने हे असह्य असल्याचे म्हटले होते. बीडब्ल्यूएफने दखल घेत आयोजकांना रक्त वाहण्याच्या घटनेची माहिती घेण्यास सांगितले. श्रीकांतच्या कोविड चाचणीचा नमुना तीनदा घेण्यात आल्याने तो तणावात होता. खेळाडूंचा सुरक्षित तपास व्हावा, तसेच त्यांना चांगले वातावरण मिळावे, याची दक्षता बाळगण्याचे बीडब्ल्यूएफने आयोजकांना आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवाल