कन्यारत्न...मोहम्मद कैफ झाला बाबा

By Admin | Published: April 5, 2017 02:52 PM2017-04-05T14:52:24+5:302017-04-05T14:54:02+5:30

क्रिकेट-राजकारण आणि पुन्हा क्रिकेट असा प्रवास करणाऱ्या मोहम्मद कैफला काल मंगळवारी कन्यरत्न झाले आहे

Kanyaratna ... Mohammed Kaif Hale Baba | कन्यारत्न...मोहम्मद कैफ झाला बाबा

कन्यारत्न...मोहम्मद कैफ झाला बाबा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - क्रिकेट-राजकारण आणि पुन्हा क्रिकेट असा प्रवास करणाऱ्या मोहम्मद कैफला काल मंगळवारी कन्यरत्न झाले आहे. त्याने ट्विट करत ही आनंदाची बातमी सांगितली. कैफच्या या ट्विटनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यामध्ये आजी-माजी खेळाडूंबरोबर बॉलिवूड कलाकारांचाही समावेश होता. बाळ व आई दोघेही ठणठणीत असल्याचे कैफने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. कैफ सध्या आयपीएलमध्ये गुजरात लायन संघाचा फलंदाज प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.
2011 मध्ये कैफने पत्रकार असलेल्या पुजा यादवशी दोनाचे चार हात करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. कैफने 2014 मध्ये उत्तर प्रदेशमधील फुलपूर मतदारसंघातून काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती.
मोहमद्द कैफला कन्यारत्नाचा लाभ झाल्याच्या बातमीनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सचिन तेंडुलकर, अजित अगरकर, हर्षा भोगले, मुरली कार्तिक, सुनील शेट्टी, बोमन इराणी, इरफान पठाण, अनिल कुंबळे, आकाश चोप्रा, आरपी. सिंग यांनी सोसल मीडियावर कैफला शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Kanyaratna ... Mohammed Kaif Hale Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.