शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कबड्डी : शारदाश्रम मुलांच्या संघाला विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 10:52 PM

दत्तगुरू नेरुरकर सर्वोत्तम 

मुंबई :  शारदाश्रम मुलांच्या (दादर) संघाने अत्यंत अटीतटीच्या अंतिम लढतीत अंतोनियो डिसुझा हायस्कूल भायखळा संघावर केवळ एका गुणाने सनसनाटी मात करून आत्माराम मोरे प्रतिष्ठान आणि आयडियल स्पोर्टस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर शालेय सुपर लीग कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. शारदाश्रम संघाने ही लढत ८०-७९ अशी जिंकली. पूर्वार्धात त्यांनी ४२-३८ अशी चार गुणांची आघाडी घेतली होती. शेवटच्या पांच मिनिटात शारदाश्रमकडे ५ गुणांची आघाडी होती मात्र अंतोनियो डिसुझा शाळेचा स्टार खेळाडू प्रथम लाथ याने प्रत्येक चढाईत बोनस आणि गुण घेत शेवटच्या क्षणी आपल्या संघाला ६९-६९ अशी बरोबरी साधून दिली. मात्र शेवटच्या चढाईत शारदाश्रम संघाच्या खेळाडूने खोलवर चढाई करून बोनस गुण वसूल करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून शारदाश्रमच्या दत्तगुरू नेरुरकरची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट चढाईसाठी प्रथम लाथ आणि मयुरेश सापते यांना तर उत्कृष्ट पकडीसाठी सोहम हातणकर आणि रोहन शिंदे यांना गौरविण्यात आले. हशू अडवाणी (गोवंडी) शाळेने शारदाश्रम टेक्निकल शाळेला हरवून तिसरा क्रमांक पटकावला. विजेत्या संघाना आत्माराम मोरे प्रतिष्ठानच्या वतीने ट्रॉफी, टी-शर्ट, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. निरंजन डावखरे, एम.एल.सी., यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनिकुमार मोरे, कृतार्थ राजा, संचालक, ए.आय.सी., नगरसेवक महादेव शिवगण, अमरहिंद मंडळाचे सचिव दीपक पडते, कबड्डी संघटक मीनानाथ धानजी, लीलाधर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Kabaddiकबड्डीMumbaiमुंबई