राष्ट्रगीताच्या वेळी शांतता! इराण महिला संघाची जगभर सुरू झाली चर्चा; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 17:05 IST2026-03-03T16:59:11+5:302026-03-03T17:05:33+5:30
Iran Women's Football Team Refuses To Sing National Anthem : ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथील सीबस सुपर स्टेडियमवर इराण आणि दक्षिण ...

राष्ट्रगीताच्या वेळी शांतता! इराण महिला संघाची जगभर सुरू झाली चर्चा; नेमकं काय घडलं?
Iran Women's Football Team Refuses To Sing National Anthem : ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथील सीबस सुपर स्टेडियमवर इराण आणि दक्षिण कोरिया महिला संघात एएफसी महिला आशियाई कप २०२६ स्पर्धेतील सलामीची सामना खेळवण्यात आला. या स्पर्धेतील उद्घाटनाच्या सामन्यात इराण महिला संघाने मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मैदानात शांततापूर्ण निषेध नोंदवला.
राष्ट्रगीताच्या वेळी जे घडलं त्याची जगभरात रंगतीये चर्चा
BIG: Iranian women’s national football team refused to sing the anthem of the Islamic Regime at the opening match of the Asian Cup in front of the entire world. pic.twitter.com/zoQSAzOQ08
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) March 3, 2026
दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी ज्यावेळी इराणचे राष्ट्रगीत वाजवले गेले त्यावेळी इराणच्या कोणत्याही खेळाडूने किंवा मुख्य प्रशिक्षक मरझियेह जाफरी यांनी राष्ट्रगीत गायले नाही. कोणत्याही खेळाच्या मैदानात ज्यावेळी राष्ट्रगीत सुरु होते त्यावेळी खेळाडू राष्ट्रगीत गाताना पाहायला मिळते. पण दक्षिण कोरिया आणि इराण महिला संघातील फुटबॉल सामन्यात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. महिला संघातील खेळाडू नेहमीप्रमाणे सामन्यापूर्वी रांगेत उभ्या राहिल्या; मात्र राष्ट्रगीत सुरू असताना त्या सरळ पुढे पाहत शांत उभ्या राहिल्या. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई (Ali Khamenei) यांच्या मृत्यूनंतर नोंदवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू सुखरूप भारतात परतली; 'या' लोकांचे मानले आभार!
इराणमध्ये महिला अधिकारांचा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सरकारच्या काही धोरणांविरोधात विविध स्तरांवर नाराजी व्यक्त केल्याचेही पाहायला मिळाले आहे. पण आता खेळाच्या मैदानातून महिला फुटबॉलपटूंनी जागतिक स्तरावर देशातील सध्याची परिस्थिती आणि सरकाविरोधातील आपली भूमिका मांडल्याचे मानले जात आहे. ज्याची जगभरात चर्चा सुरु आहे.
इराणच्या संघाचा एकतर्फी पराभव, तरी...
एएफसी महिला आशियाई कप २०२६ स्पर्धेत दक्षिण कोरिया महिला संघाविरुद्धच्या सामन्यात इराणच्या महिला संघाला ३-० अशा पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण कोरियाकडून किम हे-री हिने दोन तर चोई यू-री हिने एक गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. इराणच्या संघाला एकही गोल नोंदवला आलानाही. पण या पराभवानंतर इराणचा संघ आपल्या भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. इराणच्या संघाचा एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला असला तरी मुख्य प्रशिक्षक जाफरी यांनी संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. कोरिया हा आशियातील सर्वात मजबूत संघांपैकी एक आहे, त्यामुळे सामना कठीण असेल याची आम्हाला जाणीव होती. त्यांनी उत्कृष्ट खेळ केला, त्यांचे अभिनंदन. मात्र आम्ही स्पर्धेत जोरदार पुनरागमन करू, अशी आशा आहे.