शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
4
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
5
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
8
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
9
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
10
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
11
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
12
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
13
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
14
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
15
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
16
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
17
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
18
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
19
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
20
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

निवडणुका घ्या नाहीतर निलंबनाला सामोरे जा; IOC ने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 12:31 PM

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने एक इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने एक इशारा दिला आहे. आगामी आठवड्यात निवडणुक आयोजित नाही केली तर प्रशासक मंडळ निलंबित केलं जाईल अशी धमकी आयओसीने (International Olympic Committee) भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (Indian Olympic Association) दिली आहे. "आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि आशिया ऑलिम्पिक परिषद (OCA) भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर परिणाम करणाऱ्या घटकांवरून चिंतेत आहे." असं IOA कार्यकारी परिषदेच्या सर्व सदस्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

भारतीय ऑलिम्पिक संघटना आपली जबाबदारी पार पाडण्यात अयशस्वी ठरल्यास आणि आगामी आठवड्यात निवडणुका घेतल्या नाहीत तर दुर्दैवाने वेगळा निर्णय घ्यावा लागेल. निलंबनासह संघटनेविरूद्ध योग्य विचार करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नसेल. जोपर्यंत भारतीय ऑलिम्पिक संघटना नेहमीप्रमाणे कार्यरत होत नाही आणि निवडणुका घेत नाही तोपर्यंत अशी स्थिती कायम राहील असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. 

आयओसीने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला सुनावलंआम्हाला आशा आहे की भारतीय ऑलिम्पिक संघटना भारतातील क्रिडापटूंच्या हितासाठी कार्य करेल आणि त्यानुसार आपली जबाबदारी पार पाडेल. तसेच तुमचा याबाबत लवकर प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा असल्याचं पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुका मागील वर्षी डिसेंबरमध्ये होणार होत्या परंतु निवडणूक प्रक्रियेत सुरू असलेल्या दुरुस्तीमुळे त्या वेळापत्रकानुसार होऊ शकल्या नाहीत.

बत्रा यांच्या राजीनाम्यानंतर अस्थिरता भारतीय ऑलिम्पिक संघटनेने निवडणुका घेण्यापूर्वी दुरूस्त्या पाहण्यासाठी सहा सदस्यांची समिती स्थापन केली होती. यावर्षी मे महिन्यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने हॉकी इंडियामधील 'आजीवन सदस्य' पद रद्द केल्यानंतर नरिंदर बत्रा यांना भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या प्रमुखपदावरून हटवण्यात आले होते. त्यांच्या सौजन्याने त्यांनी २०१७ मध्ये सर्वोच्च संस्थेची निवडणूक लढवून जिंकली देखील होती. मात्र बत्रा यांनी अधिकृतपणे राजीनामा दिला त्यानंतर उच्च न्यायालयाने बत्रा यांना पुन्हा एकदा ही निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला होता. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021IndiaभारतAsian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा